अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिष्यवृत्ती

LetsUpp | Govt.Schemes अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडून १९८४-८५ या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. शासनाने एकूण २५५ संच निर्धारित सर्व अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. योजनेसाठी प्रमुख अटी ▪ शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. ▪ मागील वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण […]

Scholarship

Scholarship

LetsUpp | Govt.Schemes

अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडून १९८४-८५ या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. शासनाने एकूण २५५ संच निर्धारित सर्व अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

योजनेसाठी प्रमुख अटी
▪ शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.
▪ मागील वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक.
▪ विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.

Nilesh Rane : बिष्णाईकडून राऊतांना धमकी; राणेंकडून जावयाचा उल्लेख करत ट्विट

आवश्यक कागदपत्रे :
– माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमीक परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
– बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
– नुतनीकरणासाठी मागील वर्षाची पास झाल्याची गुणपत्रिका.

लाभाचे स्वरूप असे :
▪ ११ वी १२ प्रतिवर्ष – ३०००/-
▪ पदवीसाठी प्रतिवर्ष – ५०००/-
▪ पदव्युत्तर पदवी – प्रतिवर्ष १०,०००/-

सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ इंडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांचेकडून विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर थेट (NFT) जमा करण्यात येते.

या ठिकाणी संपर्क साधावा : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -४११ ००१.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Exit mobile version