Download App

निरोगी व घनदाट केसांसाठी ‘या’ ट्रिक्स ट्राय करा

Home Remedies For Hair: डोक्यावर सुंदर व घनदाट केस हे स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. तसेच आजकाल निरोगी व घनदाट केस सर्वाना हवे असतात. मात्र अनेकांचे केस पातळ असणे तसेच केस दुभंगलेले, केसात कोंड्यामुळे केसांची मोठी हानी ही होत असते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या सामान्य होत आहेत. मात्र काळजी करू नका तुम्हालाही केसांना रेशमी आणि मुलायम बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. दरम्यान लोक केसांसाठी अनेक उत्पादनांचा वापर करतात. यामध्ये केमिकल्स जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. मात्र आम्ही तुम्हाला काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस चमकदार आणि घनदाट बनू शकतात.

मध आणि केळी : केळी हे आरोग्य आणि त्वचेसाठी तसेच केसांसाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे केसांना रेशमी ठेवण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात पिकलेली केळी मॅश करा. आता त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण केसांना लावा, साधारण ३० मिनिटांनी पाण्याने धुवा.

खोबरेल तेल : खोबरेल तेलात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन-ई आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसांना डीप कंडिशनिंगसाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल ठेवा, आता ते गरम करा. त्यानंतर केसांना मसाज करा. सुमारे 1 तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

अंडी : केसांना रेशमी बनवण्यासाठी अंडी खूप उपयुक्त आहेत. याच्या वापराने केस चमकदार होतात. यासाठी भांड्यात अंडी फोडून फेटून घ्या. त्यात तेल घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केसांना लावा, साधारण ३० मिनिटांनी धुवा.

ऑलिव्ह ऑइल आणि मध : मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे तुमचे केस चमकदार होण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल आणि मध मिसळा. हे घटक चांगले मिसळा. आता हे केसांना लावा, अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवा.

दही : दही वापरल्याने केस रेशमी बनतात. यामुळे तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत होतील. यासाठी टाळूला दह्याने मसाज करा, काही वेळाने पाण्याने धुवा.

मेथी दाणे : मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करून केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना अनेक फायदे होतील. ही प्रक्रिया आठवड्यातून किमान तीन वेळा करा.

Tags

follow us