Download App

Activa 6G 2023 : होंडा अ‍ॅक्टिव्हा नवीन अवतारात झाली लॉन्च

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत लाखो ग्राहकांची पसंती असलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा आता आधुनिक अवतारात आली आहे. आज कंपनीने ही स्कूटर ‘स्मार्ट’ बनवून लॉन्च केली आहे.

3 व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 74 हजार 536 रुपये ठेवण्यात आली आहे. फिचर्स इतके अप्रतिम आहेत की चोर देखील या स्कूटरच्या आसपास फिरकणार नाहीत. या प्रगत होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

स्कूटरच्या या नवीन व्हेरियंटची किंमत 80,537 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. यासह, अ‍ॅक्टिव्हा रेंज तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – स्टँडर्ड, डिलक्स आणि अॅलॉय विथ स्मार्ट की.

या अ‍ॅक्टिव्हा वापरकर्त्यांना आता नवा अनुभव पाहायला मिळणार आहे. यामध्ये ऑफर केलेली की आता इतकी प्रगत झाली आहे की तुम्ही तुमची स्कूटर दूर ठिकाणाहुन लॉक/अनलॉक करू शकता. तसेच, पेट्रोल भरताना तुम्ही रिमोटचा वापर करून इंधन टाकी उघडू शकता. एकूणच, गाडी चालवताना तुम्हाला विशेष अनुभूती मिळणार आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये
यामध्ये तुम्हाला सायलेंट स्टार्ट सिस्टीम आणि स्टँडर्ड व्हेरियंट सारखी एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम पाहायला मिळेल. इतर वैशिष्ट्यांमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, सिंगल-रीअर स्प्रिंग आणि दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसारखे हार्डवेअर समाविष्ट आहेत.

स्टाइलिंग आणि मेकॅनिकल वैशिष्ट्ये जुन्या अ‍ॅक्टिव्हाप्रमाणेच आहेत. 2023 Activa 6G जानेवारीच्या अखेरीस डीलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात करेल, त्यानंतर तुम्ही ते खरेदी करू शकता.

Tags

follow us