पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा ‘हाफ टाईम’ मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?

Sleep Cycle तंदुरुस्त राहायचं असेल, तर रोज सलग 7 ते 8 तास झोपलंच पाहिज मग आपणही घड्याळ्याच्या काट्याकडे बघत कसाबसा 8 तासांचा कोटा पूर्ण करतो.

पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा 'हाफ टाईम' मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?

पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा 'हाफ टाईम' मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?

Human 8 Hours Sleep Cycle : आजकाल टीव्हीवर, सोशल मीडियावर किंवा डॉक्टरांकडे गेलं की, एकच सल्ला मिळतो “तंदुरुस्त राहायचं असेल, तर रोज सलग 7 ते 8 तास झोपलंच पाहिजे!” आपणही मग रात्री घड्याळ्याच्या काट्याकडे बघत कसाबसा 8 तासांचा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहित आहे का की, पूर्वीच्या काळात मनुष्य एकावेळी 8 तास झोपत नव्हता तर, दोन टप्प्यात झोप घेत होता. मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो? 8 तासांच्या झोपेचं सायकल नेमकं कधीपासून सुरू झालं त्याबद्दल जाणून घेऊया…

जेव्हा रात्री मिळायचा ‘हाफ टाईम’

सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वी, म्हणजेच विजेचे दिवे शोधले जाण्यापूर्वी, लोकांचे जगणे निसर्गाच्या चक्रावर चालायचे. सूर्य मावळला की अंधार पडायचा. त्यामुळे लोक रात्रीचे जेवण करून संध्याकाळी लवकरच अंथरुणावर पाठ टेकवायचे. यात पहिल्या टप्प्यात साधारण 3 ते 4 तास सुखाची झोप काढल्यानंतर, मध्यरात्री 12 ते 2 च्या दरम्यान लोकांना आपोआप जाग यायची. त्यानंतर कोणी देवाची प्रार्थना करायचे, कोणी पुस्तकं वाचायचे, तर कोणी शेजाऱ्यापाजाऱ्यांशी गप्पा मारायचे. काही जण तर रात्रीची छोटी-मोठी घरगुती कामंही उरकून घेत.

पहिल्या टप्प्यातील झोप पूर्ण झाल्यानंतर साधारण 1 ते 2 तास जागे राहिल्यानंतर लोकांना पुन्हा पेंग यायची. मग ते बेडवर जायचे आणि थेट सूर्योदय होईपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील झोप पूर्ण करायचे असे सांगितले जाते. युरोप, आफ्रिकेपासून ते पार आपल्या आशियापर्यंत जगभरात हीच ‘स्प्लिट स्लीप’ म्हणजेच तुकड्यांमधील झोप पद्धत चालू होती. अगदी जुन्या ग्रीक आणि रोमन साहित्यातही याचे पुरावे आढळतात.

‘8 तासांचं झोपेचं चक्र’ आलं कुठून?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग आता जी आपण 8 तास झोप घेतो ते चक्र आलं कुठून तर, याला दोन मोठी कारणं कारणीभूत ठरली त्यातील एक म्हणजे कृत्रिम प्रकाश आणि औद्योगिक क्रांती. 18 व्या आणि 19 व्या शतकात जसा तेलाच्या दिव्यांचा, गॅसच्या दिव्यांचा आणि शेवटी एडिसनच्या विजेच्या बल्बचा शोध लागला, तशी माणसाची रात्र बदलली. अंधारामुळे लवकर झोपण्याची सक्ती संपली. लोक रात्री उशिरापर्यंत जागू लागले, पार्ट्या करू लागले, काम करू लागले.

त्यानंतर आली औद्योगिक क्रांती. कारखाने सुरू झाले, शिफ्ट्स ठरल्या आणि कामाचे तास निश्चित झाले. आता कारखान्यात वेळेवर पोहोचण्यासाठी लोकांना एकाच वेळी आपली झोप पूर्ण करणं भाग होतं. परिणामी, रात्री दोनदा झोपण्याची जुनी पद्धत मागे पडली आणि ‘रात्री सलग 8 तास झोपा आणि सकाळी कामाला लागा’ हा नवा नियम बनला.

शरीर अजूनही जुनी सवय विसरलेलं नाही

पण, शरीर अजूनही जुनी सवय विसरलेलं नाही. ऑक्सफर्ड आणि इतर मोठ्या विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी यावर एक भारी प्रयोग केला. त्यांनी काही लोकांना काही दिवस कृत्रिम प्रकाश आणि घड्याळापासून दूर, पूर्णपणे अंधाऱ्या वातावरणात ठेवलं. आश्चर्य म्हणजे, काही दिवसांतच या लोकांच्या शरीराने पुन्हा जुनीच पद्धत पकडली ते रात्री दोन टप्प्यांत झोपू लागले.

याचा अर्थ असा की, आपल्या शरीराचं ‘बायोलॉजिकल क्लॉक’ म्हणजेच जैविक घड्याळ अजूनही त्या जुन्या सवयी विसरलेलं नाही. थोडक्यात काय तर…सलग 8 तास झोपणे हा शरीराचा मूळ स्वभाव नसून, तो आधुनिक जीवनशैलीने आपल्याला लावलेला वळणदार भाग आहे. त्यामुळे रात्री कधी डोळे उघडले, तर टेन्शन न घेता शांतपणे पाणी प्या, एखादं पुस्तकाचं पान वाचा आणि पुन्हा सुखाने ‘दुसऱ्या झोपेचा’ आनंद घ्या.

Exit mobile version