Download App

महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यावा?

LetsUpp | Govt.Schemes
आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (National Agricultural Development Scheme)बियाणे वितरण अनुदान (Seed Distribution Subsidy) 2022 योजनेसंबंधित या माहिती आज पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत.

Huma Qureshi ने बिकिनीमध्ये दाखवले तिचे सेक्सी कर्व्ह, व्हिडीओ पाहून व्हाल घायाळ

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा. कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते आदीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटीवरती (Mahadbt)सुरू आहेत.

समाविष्ट जिल्हे आणि पिके
● भरडधान्य : (मका) सांगली(sangli), अहमदनगर(Ahmednagar), छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar), जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
● गहू : सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
● पौष्टीक तृण धान्ये : ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
● भात : नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
● कडधान्य : सर्व जिल्हे
● बाजरी : नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
● ज्वारी : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
● ऊस : (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
● कापूस – (अमरावती विभाग) – अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ.
(नागपूर विभाग) : वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
● रागी – ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
(लातूर विभाग) – उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली.

‘या’ योजनेसाठी आवश्यक पात्रता काय? :
● जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज करत असेल, तर वर दिलेले जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहेत.
● शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
● जर लाभार्थ्याला या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे आणि जर वृक्ष तेलबियापिक या मधून लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
● अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

बियाणे वितरण अनुदान योजनेचा लाभ योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा? ” बियाणं वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा.

बियाणे वितरण अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
● अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र
● ७/१२ उतारा, ८ – अ प्रमाणपत्र, पूर्वसंमती पत्र, हमीपत्र

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us