Download App

पिवळ्या दातांपासून होईल सुटका, जाणून घ्या काही टिप्स

मुंबई : फास्टफूड, जंकफूड मसालेदार पदार्थ हे खाणे आजकाल सगळ्यांना आवडते. मात्र हे सगळं करत असताना आपण आपल्या दातांची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. कारण दातांची स्वच्छता केली नाही तर ते पिवळे पडू लागतात. पिवळ्या दातांमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. यासाठी दातांची योग्य स्वच्छता महत्वाची असते. मात्र जर तुमचे दात पिवळे असतील तर तुम्ही काही उपायांनी तुमच्या दातांना पुन्हा एकदा पांढरेशुभ्र बनवू शकतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय तसेच टिप्स सांगणार आहोत.

मीठ आणि स्ट्रॉबेरी : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपल्याला मीठ आणि स्ट्रॉबेरीची गरज आहे. सर्वप्रथम मीठ आणि स्ट्रॉबेरी एकत्र मिसळून ब्रशवर ठेवा आणि नंतर हळूहळू दात स्वच्छ करा. तज्ज्ञांच्या मते या उपायामुळे दात पांढऱ्या मोत्यासारखे चमकदार होतात. यामुळे पिवळ्या दातांपासून तुमची सुटका होईल.

व्हिनेगर : दातांचे पिवळेपण काढून टाकण्यासाठी पांढरे व्हिनेगर हे देखील चांगले प्रभावी मानले जाते. यासाठी तुम्ही सर्वप्रथम एक ग्लास पाण्यात 2 चमचे व्हिनेगर मिसळून घ्यावे. या नंतर चूळ भरावी. या उपायामुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच शिवाय दात पांढरेशुभ्र होण्यास देखील मदत होते.

पाच भाषांमध्ये गाणं गाणाऱ्या ‘त्या’ अवलियाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

आल्याचे पाणी : आलं अनेक औषधी गुणधर्मांने समृद्ध आहे. आयुर्वेदात देखील आल्याचे महत्व सांगितले आहे. जर दात पिवळसर होण्याची समस्या त्रास देत असेल तर ही समस्यां दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि आले मिसळून धुवावे. असे केल्याने दातांचा पिवळसरपणा आणि तोंडाचा वास दोन्ही दूर होतात.

अहमदनगरमध्ये गोपीनाथ गड उभारणार; महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंची घोषणा

बेकिंग सोडा : तुम्ही तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. यासाठी ब्रशवर 1 चिमूट मीठ आणि बेकिंग सोडा ठेवून हळूहळू दात स्वच्छ करावे लागतील. असे केल्याने दात चमकदार आणि पांढरे होतात.

Tags

follow us