Health : उन्हाळ्यात त्वचा काळवंडली? ट्राय करा ‘हे’ उपाय

How to take care of skin in summer : सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे. यातच मे महिना सुरु असल्याने तापमानात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. उन्हाचा तडाखा हा वाढला असल्याने त्वचेची लाहीलाही होत आहे. तसेच उन्हाळ्यात घाम येणे, सूर्यप्रकाश यामुळे त्वचेवर प्रतिक्रिया येऊ लागतात. अशा स्थितीत त्वचा काळवंडणे म्हणजेच टॅनिंगची समस्या उद्भवल्याचे अनेकांना अनुभव […]

Untitled Design   2023 05 23T165810.646

Untitled Design 2023 05 23T165810.646

How to take care of skin in summer : सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे. यातच मे महिना सुरु असल्याने तापमानात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. उन्हाचा तडाखा हा वाढला असल्याने त्वचेची लाहीलाही होत आहे. तसेच उन्हाळ्यात घाम येणे, सूर्यप्रकाश यामुळे त्वचेवर प्रतिक्रिया येऊ लागतात. अशा स्थितीत त्वचा काळवंडणे म्हणजेच टॅनिंगची समस्या उद्भवल्याचे अनेकांना अनुभव आला असेल. मात्र आता काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात टॅनिंगपासून कसे मुक्त होता येईल याबाबत काही महत्वाचे टिप्स सांगणार आहोत.

सनस्क्रीन वापरणे
बरेच लोक उन्हात बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरतात. तुम्हाला असे वाटते की केवळ हेच तुमची त्वचा टॅनिंगपासून वाचवेल, तर तसे नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश खूप त्रासदायक ठरू शकतो आणि त्याशिवाय कायमचे नुकसान देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत, सनस्क्रीन लावताना, तुमचे उत्पादन मधल्या बोटात आणि तर्जनीमध्ये येईल तेवढे हातात घ्या. यानंतर, त्वचेवर योग्य प्रकारे सनस्क्रीन लावा.

लिंबाचा रस
यासाठी सर्वप्रथम एक लिंबू घ्या आणि ते मधोमध अर्धे चिरून घ्या. आणि कापलेले लिंबू तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर हळुवार चोळून घ्या. थोड्यावेळ थांबून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लिंबू हे सी व्हिटॅमिनचा खजिना आहे. तसेच त्यात सायट्रिक ऍसिड सुद्धा असते. त्यामुळे ते नैसर्गिक स्किन ब्राईट्नर आहे. लिंबाच्या रसाने चेहेऱ्यावरील मुरूम व पुरळ सुद्धा कमी होऊ शकते आणि ब्लॅकहेड्स सुद्धा कमी होतात. फक्त तुमच्या चेहेऱ्याच्या त्वचेला सूट होते की नाही ह्याची खात्री करून घेऊन तुम्ही डी टॅनिंगसाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता.

काकडीचा रस आणि गुलाबपाणी
लिंबाप्रमाणेच काकडी सुद्धा त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडी व गुलाबपाण्याने त्वचा तजेलदार होते. काकडीचा रस, लिंबाचा रस व गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन ते कापसाच्या साहाय्याने तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि थोड्यावेळाने पाण्याने धुवून घ्या.यामुळे तुमची तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत तर होईलच शिवाय तुमची त्वचा निरोगी व तजेलदार राहील.

हळद आणि बेसनाचा लेप
हळद आणि बेसन हे त्वचेसाठी चांगले आहे हे तर आपल्या आज्या पणज्या लहानपणापासून आपल्याला सांगत आल्या आहेत. दोन टेबलस्पून बेसनपिठात थोडीशी हळद घाला आणि त्यात थोडे दूध व गुलाबपाणी घालून लेप तयार करा. टॅन झालेल्या त्वचेवर हा लेप लावा आणि पंधरा वीस मिनिटे ठेवून नंतर धुवून टाका. हा तर अगदी खात्रीशीर उपाय आहे तसेच सोपा सुद्धा आहे. बेसन, हळद ,दुध ह्या वस्तू तर घरात सहजरित्या उपलब्ध असतात.

Exit mobile version