Download App

Hyundai Car : ह्युंडाईने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त कार

नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी ह्युंडाईने (Hyundai) आपली ह्युंडाईने ग्रँड आय 10 Nios (Hyundai Grand i10 Nios) फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. जी ह्युंडाईचे सर्वात स्वस्त मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीची या कारची किंमत 5.58 लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्टमध्ये ब्लॅक रूफसह स्पार्क ग्रीन आणि ब्लॅक रूफसह पोलर व्हाइट यासारख्या आश्चर्यकारक ड्युअल-टोन पेंट स्कीमसह अनेक नवीनतम वैशिष्ट्यांसह एकत्रित केले आहे.

ह्युंडाई अलीकडच्या काळात भारतात अनेक मॉडेल आणणार आहे. ह्युंडाईने आपले Ioniq 5 आणि Ioniq 6 मॉडेल दिल्ली येथे आयोजित ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केले.

नवीन ग्रँडला नवीन RDE अनुरूप 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन मिळते, जे 83PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की नवीन ग्रँड i10 मॅन्युअल गिअरबॉक्ससाठी 20.7 किमीचा मायलेज आणि AMT साठी 20.1 किमीचा मायलेज देऊ शकते.

पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, नवीन ग्रँड i10 मध्ये सीएनजी पर्याय देखील सीएनजी (CNG) मोडमध्ये, इंजिन 69bhp पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी प्रकार फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.

जाणुन घ्या फिर्चस
कारमध्ये आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते. याशिवाय अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, ईएससी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी अनेक वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी, कारला सहा एअरबॅग देण्यात आला आहे.

Tags

follow us