Download App

विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

  • Written By: Last Updated:

पुणे : तुम्ही जर विंडोजचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाहीत. विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे.

१० जानेवारीपासून विंडोज ७ आणि विंडोज ८.१ हे व्हर्जन तुम्हाला तुमच्या सिस्टीमध्ये वापरता येणार नाही. या ऐवजी आता तुम्ही विंडोज१० किंवा विंडोज ११ यापैकी कुठलही व्हर्जन तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरु शकता.

तरी तुमच्या लॅपटॉमध्ये अजूनही विंडोज ७ किंवा विंडोज ८.१ असल्यास तुम्हाला गुगल देखील वापरता येणार नाही. विंडोज ७ किंवा विंडोज ८.१ च्या वापरकर्त्यांनी लवकरात लवकर अपग्रेड करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

जगभरात विंडोज ऑपरेटींग सिस्टीम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये विंडोज७ आणि विंडोज ८ वापरणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. पण आता विंडोजकडून या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट बंद केल्यामुळे हे युजर्स हॅकरच्या निशाण्यावर येऊ शकतात. त्यामुळे लवकरात हे अपडेट करून घ्या.

Tags

follow us