जर तुम्ही चांगल्या दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी चांगली जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यामध्ये 10 पास असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. डाक विभागाने एकूण 58 कर्मचारी कार चालक पदांच्या जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज बोलावले आहेत. ही पदभरती तमिळनाडू सर्कससाठी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवार हे 31 मार्च 2323 पर्यंत किंवा त्याआधी या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदभरतीची अधिकृत नोटीफीकेशन जाहीर झाली आहे. या नोटीफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या इतर पात्रेतसह उमेदवारांनी 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहन चालविण्याबाबत ज्ञात असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार या पदासाठी ऑफलाईन अर्ज करु शकतात.
लक्षात ठेवा की, अर्ज स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर्ड पोस्टने पाठवावा. उमदेवारांना अर्ज भरण्यापूर्वी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कारण, अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा अपुरी कागदपत्रे अर्जा सोबत जोडल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर
एकूण पदे –
अधिकृत परिपत्रकानुसार, 58 पदं रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा
उमदेवारांकडे हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला वाहने चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव पाहिजे.
मोटर यंत्रणेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा-
UR & EWS – 18 ते 27 वर्ष
SC & ST – उमदेवारांना 5 वर्षाची सूट
तर OBC – उमेदवारांना 3 वर्षाची सवलत आहे.
शिंदे-फडणवीस हे असंवेदनशील आणि वाचाळवीरांचं सरकार; सुप्रिया सुळेंचा घणाघात
आवश्यक कागदपत्रे –
1. वयाचे प्रमाणपत्र
2. दहावीचे गुणपत्रक
3. उत्पन्नाचा दाखला
4. ड्रायव्हिंग लायसन्स
5. अनुभवाचे प्रमाणपत्र
6. शाळा सोडल्याचा दाखला
7. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
8. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
9 पासपोर्ट साईझ फोटो
पगार-
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19000 ते 63200 रुपये पगार असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai – 600006
जाहिरात : https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_28022023_MMS_TN_Eng.pdf
● अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला द्या : https://www.indiapost.gov.in/