IGIDR Mumbai Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च (Indira Gandhi Institute of Development Research) मुंबईने सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
A R Rahmanच्या असोसिएशनला धाडली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची नोटीस
या भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा पत्ता आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटीफिकेशमध्ये दिली आहे.
पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर
एकूण पदांची संख्या – १२
शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी उमेदवारांचे पीएच.डी. पर्यंत शिक्षण असावं. तसंच किमान तीन वर्षे संशोधन/अध्यापनाचा अनुभव असावा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन/ऑफलाइन
वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याचा पत्ता– रजिस्ट्रार, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई- 400 065
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२३
नोकरी ठिकाण: मुंबई
भरती प्रक्रिया : परीक्षा आणि मुलाखत
पगार –
या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना लेवल 11 सेल क्रमांक 3 (INR 73 हजार 100) आणि 7 व्या CPC नुसार एकूण 1 लाख 33 हजार 763 रुपये (HRA सह) वेतन दिले जाईल.
अधिकृत वेबसाइट – http://www.igidr.ac.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrP1F9H08sh6f4R0VxD2nlCfJwvKAKWp70o8Q8mg0KqsFt-w/viewform
जाहिरात पहा
https://drive.google.com/file/d/1rnx72VdkUXn6arWQLVmhVnfV5yXjQ204/view