Download App

Samsung : भारत झापाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, मोदींच्या नेतृत्वात सक्षम वाटचाल

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची मोठी मोबाईल कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतातील स्मार्टफोन (smartphone) आणि टेक क्षेत्राबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सॅमसंगचे ग्लोबल प्रेसिडेंट टीएम रोह म्हणाले की, युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश आर्थिक मंदीचा (Economic downturn) सामना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनावर भर देत आहे. त्यामुळे देशात नवीन गुंतवणूक, उत्पादने आणि नोकऱ्यांची कमतरता नाही. लक्षणीय बाब म्हणजे, सॅमसंग 1995 पासून भारतात व्यवसाय करत आहे आणि कंपनीचा नोएडा येथे सर्वात मोठा कारखाना आहे.

यासोबतच टीएम रोह म्हणाले की, भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यांचा विश्वास आहे की सन 2026 पर्यंत स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 650 दशलक्ष वरून 1000 दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वाढत्या स्मार्टफोनसोबतच तंत्रज्ञानाचा वापरही भारतात अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

Devendra Fadanvis यांनी राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना केलं खूश!

जागतिक मंदीवर रोह म्हणाले की, तज्ञांच्या मते 5 ते 10 टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाऊ शकते. मंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. मात्र, या मंदीच्या काळातही भारतीय बाजाराचे वर्तन वेगळे असेल. भारतात 5G नेटवर्कच्या विस्तारामुळे, देशातील स्मार्टफोनच्या विक्रीत 60 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जाईल.

त्याच वेळी, देशातील प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली जाऊ शकते. ही वाढ केवळ एका वर्षातच नाही तर येत्या अनेक वर्षांत दिसून येईल कारण मोठ्या संख्येने तरुण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. यासोबत ते म्हणाले, ‘आम्ही भारताला जागतिक स्मार्टफोनची सर्वात मोठी बाजारपेठ मानतो.

Tags

follow us