Download App

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडट पदांसाठी भरती सुरू, हे उमेदवार करू शकतात अर्ज

  • Written By: Last Updated:

Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दलाकडून असिस्टंट कमांडंटच्या(Assistant Commandant) काही जागा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाने या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४६ पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहेत. दहावी, बारावीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक भरती 2023 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज करताना 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी कागदपत्रे जोडावीत. या भरतीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. तपशील विवरणपत्रात दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कारण अर्जात त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

एकूण रिक्त पदे – 46

पदांचा तपशील
जनरल ड्युटी – 25
टेक्निकल (मेकॅनिक)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलः – 20
लॉ एन्ट्री – 1

शैक्षणिक पात्रता-
जनरल ड्यूटी (जीडी) –
55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासाह 12वी पास + 60% गुणांसह पदवी.

कमर्शियल पायलट लायसन्स –
55 टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12वी पास + CPL (कमर्शियल पायलट लायसन्स) 55% गुणांसह उत्तीर्ण.

टेक्निकल (मेकॅनिकल)-
55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्रासह 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह नौदल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा औद्योगिक आणि उत्पादन / धातूशास्त्र / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस विषयात अभियांत्रिकी पदवी

मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदेंचा नगर दौरा; पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार 

टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) –
55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12वी पास+ 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकी पदवी.

लॉ एन्ट्री –
60% गुणांसह एलएलबी.

वय श्रेणी-
ओबीसी – 3 वर्षांची सूट
मागासवर्गीय – 5 वर्षे सूट

अर्ज फी – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर २०२३

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1BBhs_K46m6_r8nyk3Uld6Gh77101f95u/view

Tags

follow us