Railways Recruitment 2023 : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा हा विभाग सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया राबवते. आताही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियनसाठी बंपर भरती आयोजित केली आहे. (Indian Railways Recruitment 2023 1016 Posts of Loco Pilot Posts)
या भरती मोहिमेअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 1016 पदांची भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार या रेल्वेच्या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइट http://www.secr Indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेतील या भरतीसाठी उमेदवार २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
पदांची संख्या
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने एकूण 1016 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
यामध्ये असिस्टंट लोको पायलटच्या 820 पदे,
टेक्निशियनच्या 132 पदे आणि
कनिष्ठ अभियंत्यांच्या 64 पदांचा समावेश आहे.
खत लिंकिंगचा बाजार रडारवर! शेतकऱ्यांच्या फसवणुकीला बसणार चाप; मुंडेंनी सांगितला सरकारी प्लॅन
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक लोको पायलट हा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असावा. तसंच संबंधित क्षेत्रामध्ये IIT किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. टेक्निशिअन पदासाठी, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयटी प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर्स) पदांसाठी, उमेदवारांना मूलभूत प्रवाहात तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 42 वर्षाच्या दरम्यान, असावं.
निवड प्रक्रिया-
रेल्वेमधील उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित माध्यमातून घेतली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी फेरीतून जावे लागेल.
जाहिरात-
https://secr.indianrailways.gov.in/uploads/files/1689744127508-GDCE%202023%20final.pdfhttps://secr.indianrailways.gov.in/uploads/files/1689744127508-GDCE%202023%20final.pdf
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी प्रथम indianrailways.gov.in च्या वेवसाईटवर जावं. त्यानंतर रिक्रूटमेंट/न्यूज/प्रेस रिलीजवर क्लिक करा.
त्यानंतर भरती लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म भरा. त्या फॉर्मसोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा.