Instagram Launches Threads : मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी आणलेल्या नवीन ‘थ्रेड्स’ प्लॅटफॉर्मवरून वाद वाढतच आहे. विशेषत: ट्विटरचा सीईओ इलॉन मस्कने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या फिचरच्या निमित्ताने मस्कने झुकेरबर्गला टोमणे मारले असून त्याला ‘जक इज अ कक’ असे म्हटले आहे.
खरं तर, अलीकडेच फास्ट फूड चेन वेंडीजच्या थ्रेड्सचा स्क्रीनशॉट डेटा हॅझार्ड नावाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला होता. यामध्ये वेंडीजने इलॉन मस्क आणि ट्विटरचा खरपूस समाचार घेतला. वेंडीजने झुकेरबर्गला सुचवले की मस्कला चिडवण्यासाठी त्याने अंतराळात जावे.
यावर झुकेरबर्गने हसणारी इमोजी देऊन प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे इलॉन मस्क त्याची कंपनी स्पेसएक्सच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत मंगळ मोहीम सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत वेंडीचा हा धागा मस्कच्या स्पेसएक्स कंपनीवर टोमणा मारणारा होता. ट्विटरवरील थ्रेड्सच्या या स्क्रीनशॉटला उत्तर देताना, इलॉन मस्कने प्रत्युत्तर दिले आणि झुकरबर्गचे नाव विकृत केले, लिहिले – ‘जक इज अ कक’.
Manmohan Mahimkar: ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची अंकिताकडे विनवणी, म्हणाले- ‘मुली, मला काम हवंय..’
यापूर्वी, ट्विटरने मेटा प्लॅटफॉर्मवर त्याच्या नवीन थ्रेड्स प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. याबाबत ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्रही पाठवले आहे. हा संपूर्ण वाद कॉपीराईटवरून सुरू झाला आहे. थ्रेड्सचा इंटरफेस ट्विटरसारखा असल्याचा ट्विटरचा दावा आहे.
याशिवाय ट्विटरवर थ्रेड्स नावाचे फीचर आहे. जेव्हा एक लांब ट्विट अनेक भागांमध्ये विभागले जाते तेव्हा ते थ्रेडमध्ये विभागले जाते. अशा परिस्थितीत ट्विटरनेही कॉपीराइटचा दावा केला आहे. या अहवालावर मेटाने अद्याप भाष्य केलेले नाही.