Download App

Exclusive : ‘तो’ शब्द खटकला अन् सतीश मगर यांनी मगरपट्टा सिटी निर्माण केली

Interview of Magarpatta City woner Satish Magar : मगरपट्टा सिटी म्हटलं की आपल्याला पुण्यातील उच्चभ्रु आणि सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं शेतकऱ्यांच्या सहभागातून वसवलेले टाऊनशिप डोळ्यासमोर येत. आज हा भाग पुण्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असा शहरातील सर्व गोष्टींना पर्याय ठरणारा लक्झरी एरिया मानला जातो. मात्र या भागाची निर्मिती कशी झाली? ती कोणी केली? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण थेट जाणून घेऊयात मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्याकडून…

मगरपट्टा सिटीची स्थापना कशी झाली यावर सतीश मगर सांगतात की, ‘आपल्याला शेतकरी व्हायचं होतं, त्यासाठी अॅग्रीकल्चरची पदवी घेऊन आपण ग्रॅज्युएट झालो. सुरुवातीला शेतीही केली. मात्र त्यादरम्यानच पुणे शहर विकासाची योजना आली. त्यामध्ये मगरपट्टा ज्या ठिकाणी आपलं शेती करण्याचे स्वप्न आहे. त्या भागाचे भविष्यात शहरीकरण होणार आहे. असं कळालं, त्यावेळी आपल्या वडीलधाऱ्यांनी हा भाग शेतीसाठीच राहावा यासाठी सरकारशी लढा दिला. त्या लढ्यामध्ये एक तरुण म्हणून मी त्यांना मदत केली. मात्र हे माहीत होतं की भविष्यात कधी ना कधी या भागाचे शहरीकरण होणार आहे.’ असं सतीश मगर सांगतात.

‘आपल्या या प्रकल्पामागील डोक्यातील एक सल मगर सांगतात, ‘ज्यामुळे या प्रकल्पाचे धडाडी आपल्या मनात निर्माण झाली. मगर सांगतात हा प्रकल्प निर्माण करताना अनेक शेतकऱ्यांना जमीनी विकल्यास आपल्याला किती फायदा होईल? त्या तुलनेत ही जमीन आपण विकसित केली तर आपल्याला किती जास्तीत जास्त फायदा होईल? हे पटवून दिलं.’

‘त्याचबरोबर शेतकऱ्याने एखादा व्यवसाय केल्यास लोकांकडून हे शेतकऱ्याने आपली शेतजमीन घेऊनच हा व्यवसाय उभारल्याचं ठपका ठेवला जातो. हीच सल सतीश मगर यांच्या मनाला बोचली होती. कारण पुणे आणि परिसरात गुंठामंत्री हा शब्द शेतकऱ्यांसाठी प्रचलित होता. त्यामुळे आपल्या सगळ्या गुंठ्यांचा एकत्रिकरण करून एक विकसित प्रकल्प निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी मगरपट्टा सिटीच्या रूपाने पाहिलं.’ असं यावेळी मगर यांनी सांगितलं.

लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप बिझिनेस महाराजा’ हे मुलाखत सूत्र सुरू केले आहे. यामध्ये नामांकित उद्योगपती, उद्योजक बांधकाम व्यावसायिक यांच्या जीवनाविषयीची फिलॉसॉफी, त्यांचं व्यवसायातील यश, त्या मागचे कष्ट प्रयत्न आणि विशेष म्हणजे जी नवी पिढी अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये उतरू इच्छित आहे. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या युक्त्या अशा सर्व गोष्टी या मुलाखत सत्रामध्ये जाणून घेतल्या जाणार आहेत. दरम्यान या मुलाखत सत्राची सुरुवात पुण्यातील मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्या मुलाखतीने करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले अथक परिश्रम खडतर प्रवास आणि मिळालेले यश त्याचबरोबर विविध विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली.

Tags

follow us