Sukanya Samriddhi Yojana : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) काही दिवसांपूर्वी रेपो दरात (Repo Rate) कपात केल्याने अनेक बँकांनी (Bank) व्याजदरात कपात केल्याने एफडीवरील (FD) व्याजदरात देखील कपात करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम अनेक ग्राहकांनावर होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे आता देखील काही बचत योजनांमध्ये 8.2 टक्के व्याजदर मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या काळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी लहान बचत योजना फायदेशीर ठरु शकते. देशात सुरु असणाऱ्या अनेक बचत योजना दरवर्षी 7-8 टक्केपर्यंत परतावा देतात, तर एफडीमध्ये सहसा 6-7 टक्के दरम्यान परतावा मिळतो.
एसबीआय सामान्य ग्राहकांना त्यांच्या 1 वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज देते. तर युनियन बँक ऑफ इंडिया एका वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के आणि बँक ऑफ बडोदा 6.85 टक्के व्याज देते. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना या ठेवींवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळते.
देशात सुरू असलेल्या बचत योजनांवर 6.7 ते 8.2 टक्के व्याज मिळते. गुंतवणूकदारांना ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) 8.2 टक्के व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.2 टक्के आहे. जानेवारी 2025 मध्ये सरकारने हा व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के केला. या खात्यावरील व्याज दरवर्षी वाढवले जाते.
पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, जाणून घ्या सर्वकाही
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) तिमाही आधारावर 8.2 टक्के व्याज मिळत आहे. हा व्याजदर एप्रिल 2023 मध्ये 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आणि तो आतापर्यंत लागू आहे. या योजनेत किमान ठेव 1000 रुपयांपासून सुरू होते आणि गुंतवणूकदार 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.