Fixed Deposit Benefits : गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध (Investment) आहेत. मुदत ठेव भारतीय लोकांची पाहिली पसंत आहे. अन्य बचत पर्यायांच्या तुलनेत भारतात फिक्स डीपॉझिटला जास्त महत्व दिले जाते. कारण एफडी एक (Fixed Deposit) सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यात कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. ज्यांना कोणतीच जोखीम नको असते त्यांच्याकडून एफडीलाच प्राधान्य दिले जाते. एफडीत गॅरंटी रिटर्न मिळतो. या बरोबरच गुंतवणूकदाराला आणखीही काही फायदे मिळतात.
एफडीमुळे एक मोठा फायदा मिळतो पण बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसते. होय, जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या नावावर एफडी उघडली तर अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फायद्याबाबत अनेकांना माहिती नसते. चला तर मग कोणकोणते फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊ या..
एफडीतून जो परतावा मिळतो त्यावर टीडीएस (TDS) द्यावा लागतो. एफडीचे मिळणारे व्याज गुंतवणूकदारांच्या कमाईत जोडले जाते. भारतात अनेक महिला लोअर टॅक्स ब्रकेटमध्ये येतात ज्या गृहिणी असतात त्यांना एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही. जर तुम्ही पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्ही टीडीएस पासून बचाव करू शकता. तसेच टॅक्समधूनही बचत करता येते.
एका व्यापारी वर्षात एफडीवर 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले तर 10 टक्के टीडीएस द्यावा लागेल. जर अशा परिस्थितीत एफडी पत्नीच्या नावावर आहे तर फॉर्म 15 डी भरून टीडीएस पासून बचाव करता येतो.
जर एखाद्या व्यापारी वर्षात एफडीवर 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर 10 टक्के टीडीएस द्यावा लागेल. पण जर एफडी पत्नीच्या नावावर असेल तर फॉर्म 15जी भरुन टीडीएस भरणे टाळता येऊ शकते. जर पती आणि पत्नी दोघांनी संयुक्त मुदत ठेव केलेली असेल आणि त्यात पत्नी फर्स्ट होल्डर असेल तर टीडीएस बरोबरच टॅक्स पेमेंटही करावे लागणार नाही.
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण