PhonePe Paytm close rent payment Feature after RBI Change Rules for House rent : ग्राहकांकडून अगदी छोट्या व्यवहारांपासून ते थेट मोठ्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. त्यामध्ये घरभाडे देण्यासाठी या ऑनलाईट पेमेंट अॅपवर असणाऱ्या रेंट पेमेंट सर्व्हिसचा वापर केला जात होता. मात्र आता आरबीआय आणलेल्या नव्या नियमानुसार हा पर्याय वापरता येणार नाही. त्यामुळे या कंपन्यांनी रेंट पेमेंट सर्व्हिस हा पर्याय बंद करून टाकला आहे.
गेल्या काही वर्षांत रेंट पेमेंट सर्व्हिसद्वारे क्रेडिट कार्डचा वापर करणे वाढले होते. काही ग्राहक याचा वापर प्रत्यक्ष घरभाडे देण्यासाठी नाही तर स्वत: च्या बॅंक खात्यात पैसे पाठवत होते. त्यावर फिनटेक कंपन्या त्यांच्याकडून वारेमाप व्याज वसूल करत होत्या. दुसरीकडे वापरकर्ते या पैशांचा महिनाभर बिनव्याजी वापर करून पॉईंट मिळवत होते. त्यांना आता भाडे भरताना थेट बॅंक खात्यावर पैसे जमा करणे किंवा चेक यांसारख्या जुन्या पद्धतींचा वापर कराव लागणार आहे.
दरम्यान या बदलेल्या नियमामध्ये आरबीआयने सांगितले आहे की, पेमेंट अॅग्रीगेटर आणि पेमेंट गेटवेचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार आता भाडेकरूंना घरमालकांना आता फिनटेक कंपन्यांच्या अॅप्स द्वारे क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरता येणार नाही. तसे करायचे असल्यास संबंधित घरमालकाचे भाडेकरूंशी थेट करार झालेला हवा. त्याची केवायसी आणि पडताळणी झालेली हवी. मात्र बहुतेकदा घरमालकांना व्यापारी म्हणून बोर्ड केलेले नसतो त्यामुळे आता ग्राहक रेंट पेमेंट सर्व्हिसद्वारे क्रेडिट कार्डचा वापर करू शकणार नाहीत.