Download App

पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra IMD Alert : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या

Maharashtra IMD Alert : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून येत्या चार दिवसात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे.

हवामान अंदाज काय ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थानसह (Rajasthan) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि खालपर्यंत सक्रिय होत असल्याने पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 3, 4 आणि 5 मेसाठी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक (Nashik) , अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे 3 मे रोजी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे (Pune) , अहिल्यानगर (Ahilyanagar) , नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव,अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया येथे 4 मे रोजी हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pahalgam Terror Suspects : पहलगाम हल्ला, दहशतवादी श्रीलंकेत? विमानतळावर शोध मोहीम सुरु

तर 5 मे रोजी संपूर्ण राज्याच अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर 6 मे रोजी सातारा, पुणे, ठाणे, पालघर , नाशिक, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अहिल्यानगर आणि चंद्रपूर येथे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 7 मे रोजी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुलीने अचानक थांबवली स्कूटर अन् उचलला रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज, व्हिडिओ व्हायरल

follow us