Download App

iPhone 15 लाँच! दमदार फीचर्स, फोटोग्राफीसाठी क्लासच; किंंमत किती?

iPhone 15 Launch : अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये अनेक नव्या प्रॉडक्टची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षीत Iphone 15 या सिरीजमधील चार फोन लाँच करण्यात आले. या फोनमध्ये काही हटके फीचर्स दिले असून हे स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीली उतरतील असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने iphone 15, iphone 15 Plus, iphone 15 Pro, iphone 15 Pro Max असे चार फोन लाँच केले आहेत. यामध्ये काही खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या सिरीजमधील फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 15 सप्टेंबरपासून प्री बुकिंग करू शकता, अशी माहिती मिळाली आहे. हे फोन येत्या 22 सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

किती आहे किंमत?

iphone 15 च्या 128 जीबी स्टोअरेज असणाऱ्या फोनची किंमत भारतात 79 हजार 900 रुपये इतकी आहे. तसेच 256 जीबी स्टोअरेज फोनची किंमत 89 हजार 900 रुपये तर यातीलच हायएंड 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार 900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

iphone 15 Plus च्या 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 89,900 रुपये, 256 जीबी 99,900 रुपये तर 512 जीबी हायएंट व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये आहे. हे दोन्ही फोन पाच कलर पर्यायात उपलब्ध असतील. यामध्ये ब्लू, पिंक, यलो, ग्रीन आणि ब्लॅक हे पाच कलर आहेत. या दोन्ही फोनमध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप आणि 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

iphone 15 Pro Max मधील 256 जीबी मॉडेलची किंमत भारतात 1,59,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 1,79,900 रपये तसेच हायएंड 1TB फोनची किंमत 1,99,900 रुपये आहे.

iphone 15 Pro आणि Pro Max या दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. नॅचरल टायटेनियम, ब्लू टायटेनियम, ब्लॅक टायटेनियम आणि व्हाइट टायटेनियम असे चार कलर पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच यात कस्टमाइज अॅक्शन बटन आणि नेक्स्ट जनरेशन पोट्रेट सुविधा असेल.

फीचर्सही आहेत हटके

नव्या प्रो आयफोन्समध्ये टेलिफोटो लेन्स, नवी A17 प्रो बायोनिक चिपसेट, युएसबी C आणि ios 17 असे बदल करण्यात आले आहेत. स्पेशल लेन्समुळे हे दोन्ही फोन फोटोग्राफीसाठी खास तयार केले आहेत. Apple iPhone 15 Pro मध्ये 6.1 इंच डिस्प्ले तर Apple iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंच डिस्प्ले स्क्रिन आहे. अॅपल 15 प्रो फोनमध्ये पोट्रेट नाईट मोडमध्ये देखील उत्कृष्ट फोटो घेता येतील.

Tags

follow us

वेब स्टोरीज