Parliament of India Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असणाऱ्यां युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संसदेत दुभाषी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. भारतीय संसदेने जाहीर केलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक Advt_No_2-2023 असा आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, पगार याबाबतची सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या भरती अंतर्गत भारत सरकारच्या संसद टेलिव्हिजनमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्याासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. 3 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
भारत सरकारच्या संसद टिव्हिमध्ये दुभाषी पदासाठी 13 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 8 इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी 5 जागा आहे. याचे पात्रता, निकष जाहिरातीमध्ये सविस्तर देण्यात आले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. पार्लमेंट ऑफ इंडिया भरती 2023 साठी संसदेच्या अधिकृत वेबसाइटवर पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच अर्जात खोटी माहिती आढळल्यास उमेदवाराला तात्काळ निलंबित करण्यात येईल.
पदाचे नाव – इंग्रजी/हिंदी/ प्रादेशिक दुभाषी
एकूण जागा – 13
आरक्षित जागा –
या एकुण भरल्या जाणाऱ्या पदांपैकी 2 जागा एससी (SC) कॅटेगरी, 4 जागा ओबीसी (OBC) कॅटेगरी, 6 जागा युआर (UR) कॅटेगरी आणि एक जागा इडब्ल्यूएस (EWS) कॅटेगरीसाठी आरक्षित आहेत.
शैक्षणिक पात्रता –
1. इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –
इंग्रजी/हिंदी दुभाषीपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मास्टर डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीत मास्टर डिग्री किंवा हिंदीत मास्टर डिग्री पदवी स्तरावर असणे गरजेचे.
2. प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी –
संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयीत मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
Shyam Benegal Health : प्रसिद्ध दिग्दर्शकांची प्रकृती गंभीर, किडनीच्या आजाराने त्रस्त
वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा 35 वर्षे
पगार – 56100-177500
निवड प्रक्रिया
या रिक्त जारांगासाठी लेखी, मौखिक चाचणी तसेच वैयक्तिक मुलाखत घेण्यात येणार आहे. मौखिक चाचणी 200 मार्कांची तर लेखी चाचणी 100 मार्कांची असणार आहे. वैयक्तिक मुलाखत 50 गुणांची असणार आहे.
● अर्ज करण्याची अंतिम तारीख – 3 एप्रिल 2023
● या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : https://loksabha.nic.in/