Download App

ESIS Thane Bharti 2023: ESIS रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू, थेट मुलाखत….

  • Written By: Last Updated:

ESIS Thane Bharti 2023: तुम्ही जर वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले असेल आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल (Maharashtra Employees State Insurance Society Hospital) ठाणे येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

Sujay Vikhe : नगर जिल्हा विभाजन होणार का? खा. विखेंनी स्पष्टच सांगितलं 

या भरतीअंतर्गत एकूण २२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचा अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पध्दतीने सबमिट करावा लागेल. तर अर्जाची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता याविषयी तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपटत करतो. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतच असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. अशांसाठी या भरतीची उत्तम संधी चालून आहे. या भरतीसाठी उमदेवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी कुठहेली टीएडीए देण्यात येणार नाही. उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, गट अ

एकूण पदांची संख्या – 22

शैक्षणिक पात्रता – MBBS

नोकरीचे ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – 69 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता –
वैद्यकीय प्रशासन अधिकारी,
महाराष्ट्र राज्य कामगार विमा संस्था, R.K.V.Y.O. हॉस्पिटल ठाणे.
दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे – 400604

ई-मेल पत्ता– amosisthanc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख- 30 आणि 31 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.esic.nic.in

महत्त्वाची कागदपत्रे –
वैध MCI/राज्य वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र.
वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे/प्रमाणपत्रे.
जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासह
अनुभव प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)/प्राधान्य
पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स प्रत
दोन फोटो.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1DsQcj_KkkE4JmjNQ_sOVjrmgxo3IoOJX/view

Tags

follow us