जगावर 2008 सारखे आर्थिक संकट घोंगावतय ? सर्वात मोठ्या वित्तीय संस्थेचे भाकित

Jp morgan ceo jamie dimon : सध्याची जगभरातील शेअर बाजाराची स्थिती 2005-2007 या कालावधी सारखी मिळती जुळती आहे.

J P Morgan

J P Morgan

Jp morgan ceo jamie dimon warning market crash : एआयमुळे आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळत आहेत. भारतातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस या आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. या कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती सुमारे पंधरा ते वीस टक्क्यांनी घटल्यात. त्यात जगात सर्वात मोठी वित्तीय सेवा पुरविणाऱ्या जेपी मॉर्गन चेजचे (Jp morgan) मुख्य कार्यकारी जेमी डिमोन यांनी एक भाकित वर्तविले आहे. 2008 सारखे आर्थिक संकट जगावर कोसळणार असल्याते त्यांचे भाकित आहे. जेमी डायइम यांनी हे भाकित कशाचा आधारे केलंय हे लेट्सपअ मनीमध्ये जाणून घेऊया.

2008 मध्ये जगावर मोठे आर्थिक संकट आले होते. या संकटातून सावरण्यासाठी अनेक वर्ष लागले होते. यासारखेच संकट पुन्हा घोंगावतय, असा दावा जेपी मार्गनचे जेमी डिमोन यांनी केलाय. सध्याची जगभरातील शेअर बाजाराची स्थिती 2005-2007 या कालावधी सारखी मिळती जुळती आहे. सध्या शेअर बाजारातून चांगला नफा कमविला जात आहे. परंतु गुंतवणूकदारांना भविष्यातील धोका लक्षात येत नाही. सध्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. गुंतवणूकदार हे पैसे कमविण्यासाठी मोठी जोखीम घेताना चुकीचे निर्णय घेत असल्याचे जेमी डिमोन यांनी म्हटलंय. शेअर बाजारातील तेजीमुळे सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली वाटत आहे. परंतु अशी परिस्थिती भविष्यात नसणार आहे, असा इशारा जेमी डायमन यांनी केलाय. सध्याची पसिस्थिती राइजिंग टाइड लिफ्ट्स ऑल बोट्स अशी आहे. म्हणजे शेअर बाजार वरती जात आहे. त्यामुळे सर्वच जण नफा कमवत आहेत. अस्थिर आणि जोखमीच्या परिस्थितीत सर्वजण बाजारात खूप मोठी रिस्क घेत आहेत, असे जेमी डाइमन यांनी म्हटलंय.

डाइमन यांनी वित्तीय संस्थांना फटकारले आहे. वित्तीय संस्था या चांगला परतावा म्हणजे रिटर्नसाठी मोठी जोखीम घेत आहे. टॅरिफ आणि आर्टिफिशयल इंटेलिजेंस एआयच्या घडामोडीचे परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.


नवीन इकोनॉमिक सायकल

शेअर बाजारात सध्या जोखीम वाढत आहे. परंतु कधीही नवीन इकोनॉमिक सायकल म्हणजेच अर्थचक्र सुरू होईल. परंतु हे कशामुळे सुरू होईल हे सांगू शकत नसल्याचे डिमोन यांनी म्हटलंय. शेअर, प्रॉपर्टीच्या वाढलेल्या किंमती दिलासा देणार नाही. उलट किंमती जास्त वाढल्यास किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याचा धोका निर्माण होतो, असे डायमन यांचा दावा आहे. 2008 च्या आर्थिक संकटात वृत्तपत्र, वीज निर्मिती आणि फोन कंपन्यांचे सेक्टर हे सुरक्षित मानले जात होते. परंतु त्यानंतर या सेक्टरमध्ये मोठे नुकसान झाले होते, असे डिमोन यांनी स्पष्ट केले होते. स्वॉफ्टवेअर इंडट्रीवर एआयचा मोठा परिणाम होणार आहे. सध्या सगळं मजबूत दिसत असलं तरी भविष्यात आयटी कंपन्यांसमोर मोठे चॅलेंज असणार आहे, अशी भविष्यवाणीही डाइमन यांनी केलीय.


टेक शेअर्समध्ये पडझड काय होतेय ?

एआयने जगभरातील टेक शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. एआय टेक्लोलॉजीमुळे पारंपरिक नोकऱ्या आणि बिझनेस मॉडेलमध्ये बदल होईल, अशी भिती गुंतवणूकादारांमध्ये आहे. एआय (AI) स्टार्टअप अॅंथ्रोपिक (Anthropic) ने Claude Cowork एजंटचा नवीन प्लग इन्स लॉंच केलाय. या टूल्समुळे सेल्स, मार्केटिंग आणि डेटा अॅनालिसिससारखे डिपार्टमेंटसचा कामे ऑटोमेटिक होणार आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे.


2008 मध्ये आर्थिक संकट का आले ?

2008 चे आर्थिक संकट हे अमेरिकेमुळे उदभवले होते. 2001 ते 2006 या कालावधीत अमेरिकेतील रिअल इस्टेट कंपन्यांना मोठी कर्जे मिळाली होती. त्यात रिअल इस्टेटच्या किंमती वाढल्या होत्या. तर घर विक्रीचा बुडबुडाही फुटला होता. त्यात 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स हे बँक दिवाळखोरीत निघाली. त्यानंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले आणि जगात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. आताची भू राजकीय संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ आणि एआयमुळे जगात आर्थिक संकट येणार आहे.

Exit mobile version