Download App

कॅन्सरची लक्षणे दिसण्याच्या आधीच कळणार आजाराचा पत्ता; चमत्करिक शोध यशस्वी

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटच्या अभ्यासकांनी एक शोध केला आहे. याद्वारे दोन ते तीन वर्षे आधीच कॅन्सरचा शोध घेतला जाऊ शकतो.

Cancer Detection : जगभरात कॅन्सर हा एक अतिशय घातक आजार म्हणून ओळखला (Cancer Detection ) जातो. या आजाराचे रुग्ण सध्या वाढत चालले आहेत. जगात कॅन्सरमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतात. सन 2022 मध्ये कॅन्सरमुळे जगभरात तब्बल 97 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यातील बहुतांश प्रकरणात रुग्णांचा मृत्यू रोखता आला असता. कॅन्सरची कारणे आणि त्यापासूनचा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी नियमित तपासणी आणि वेळेवरच लक्षणे समजली तर योग्य उपचार घेता येतात.

अलीकडच्या काळात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. मेडिकल सायन्समध्ये नवाचार आणि उपचारांत प्रगती झाल्यानंतरही रुग्णांची कॅन्सरविरुद्धची लढाई अजूनही आव्हानात्मकच आहे. पण, आता दिलासा देणारी बातमी आली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटच्या अभ्यासकांनी एक चमत्कारिक शोध केला आहे. याद्वारे दोन ते तीन वर्षे आधीच कॅन्सरचा शोध घेतला जाऊ शकतो.

उशिरा निदानामुळे वाढतो धोका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर या आजाराचे निदान उशिराने होते. त्यामुळे उपचारात अडचणी येतात. आपल्याला कॅन्सर आहे याचा पत्ता रुग्णांना नसतो. कारण याची कोणतीच लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसत नाही. अगदी बेमालूमपणे कॅन्सर शरीरात फैलावत असतो. त्यामुळे कॅन्सर जेव्हा आवाक्याबाहेर जातो तेव्हा याचे निदान होते. अशा परिस्थितीत औषधोपचार करून रुग्णाना वाचवणे आणखी कठीण होते.

काय सांगता! आता AI करणार कॅन्सरची तपासणी; एका थेंबातूनच कळणार आजाराचा पत्ता

भारतासारख्या देशात खासकरून ग्रामीण भागात सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचे निदान होणे खूप कठीण बाब आहे. वैज्ञानिकांनी आता या चिंता दूर करुन एका अनोख्या रक्त तपासणीची माहिती दिली आहे. याद्वारे कॅन्सरची लक्षणे दिसण्याच्या काही वर्ष आधीच आजाराचा पत्ता लावण्यात मदत करू शकते. कॅन्सरमुळे होणारे मृत्यू कमी करण्यातही ही तपासणी महत्वाची ठरू शकते.

कॅन्सर डिस्कव्हरी जर्नलमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासकांनी सांगितले आहे की कॅन्सरचे निदान होण्याच्या काही वर्षे आधी व्यक्तीच्या रक्तात काही असे मार्कर असतात ज्यांच्या मदतीने लक्षात येऊ शकते की त्या व्यक्तीला कॅन्सरचा धोका आहे किंवा नाही. याचा अर्थ असा की रक्त तपासणीच्या मदतीने डॉक्टर कॅन्सरचे निदान काही वर्षे आधीच करू शकतात. यामुळे संबंधित रुग्णावर वेळीच उपचार करता येऊ शकतील.

काय म्हणतात अभ्यासक

कॅन्सर काही एका दिवसात विकसित होत नाही. हा आजार दीर्घकाळ शरीरात वाढत असतो. याकडे आपले लक्ष नसते. ज्यावेळी एखाद्याला कॅन्सर होतो तेव्हा ट्यूमर रक्त प्रवाहात अनुवांशिक पदार्थांचे काही लहान तुकडे सोडतो. हेच पदार्थ आजाराचे कोणतेही लक्षण दिसण्याआधी रक्तात दिसू शकतात असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मल्टीकॅन्सर अर्ली डिटेक्शन

कॅन्सरचा आधीच शोध घेण्यासाठी अभ्यासकांनी सहभागी लोकांचे रक्त नमुने गोळा केले. त्यानंतर यांना काही वर्षे ट्रॅक केले गेले. एमसीईडी (मल्टीकॅन्सर अर्ली डिटेक्शन) नावाच्या विशेष लॅब टेस्टच्या माध्यमातून रक्तात कॅन्सरच्या संकेतांना नोटीस केले गेले. ज्या लोकांच्या रक्तात ट्यूमरद्वारे रिलीज लहान कण होते त्यांना पुढील काही वर्षात कॅन्सरचे निदान करण्यात आले.

मिठाचं अतिसेवन बेतू शकतं जीवावर, ‘या’ गंभीर कर्करोगाचा धोका

follow us