शरीराच्या तापमानात होतोय बदल, जाणून घ्या कोणत्या काय आहेत लक्षणे ?

Body Temperature : आपल्या शरीराचे तापमान बदलत असते. काही वेळेस शरीर नेहमीपेक्षा जास्त गरम झाल्याचे जाणवते तर काही वेळेस शरीराचे तापमान अत्यंत कमी झाल्याचे वाटते. शरीरात हे बदल नेमके का आणि कसे होतात हे जाणून घेणे महत्वाचेड आहे. कारण, अशा बदलत्या तापमानामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अनेक जणांना याबद्दल माहिती नसतं. आपल्या […]

Body Temperature

Body Temperature

Body Temperature : आपल्या शरीराचे तापमान बदलत असते. काही वेळेस शरीर नेहमीपेक्षा जास्त गरम झाल्याचे जाणवते तर काही वेळेस शरीराचे तापमान अत्यंत कमी झाल्याचे वाटते. शरीरात हे बदल नेमके का आणि कसे होतात हे जाणून घेणे महत्वाचेड आहे. कारण, अशा बदलत्या तापमानामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अनेक जणांना याबद्दल माहिती नसतं. आपल्या शरीरात जास्त उष्णता असण्याचा अर्थ असा होतो की तुमचं पोट गरम आहे आणि तुमची जीवनशैली चांगली नसल्याचे ते द्योतक आहे. या सोबतच काही शारीरिक क्रिया देखील शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम करतात. आज शरीरातील उष्णतेपासून होणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल आपण जाणून घेऊ या..

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

वारंवार तोंड येणे

एखाद्या व्यक्तीच्या तोंडात वारंवार फोड येत असतील तर पोटात उष्णता वाढली की तोंडात फोड येऊ लागतात. त्यामुळे शरीरातील ही जळजळ फोडातून बाहेर येते. कधीकधी पोटातील उष्णता फोडांच्या रूपात बाहेर येते.

डोकेदुखी

शरीरात उष्णता वाढण्याची अनेक लक्षणे असू शकतात. जसे की उष्णतेमुळे डोकेदुखी आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये अडथळा येणे. याशिवाय शरीरात उष्णता वाढल्याने उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवते. डोकेदुखी-मळमळ ही सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर समजून घ्यायला पाहिजे की हे उष्णतेमुळे होत आहे. मळमळ येण्यापासून ते डोके दुखणे ही देखील शरीरात वाढलेल्या उष्णतेची लक्षणे असू शकतात. वास्तविक, शरीरात उष्णता वाढली की सर्वात आधी पचनसंस्थेवर परिणाम होतो. ज्यामुळे मळमळ होते. त्यामुळे अॅसिडिटी जास्त होते. त्यामुळे मळमळ आणि चक्कर येण्याची समस्या होते.

अस्वस्थता आणि थकवा

अस्वस्थता आणि थकवा हे शरीरातील उष्णता वाढण्याचे मुख्य कारण असू शकते. जेव्हा आपल्या शरीरातील पाणी कमी होते तेव्हा आपल्याला अस्वस्थता आणि थकवा येतो. शिवाय बीपी कमी होतो, अशा स्थितीत आपल्याला पुन्हा पुन्हा थकवा येऊ लागतो.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

शरारत उष्णता असेल तर या गोष्टींची काळजी घ्या 

तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा, तसेच गरम मसाला अजिबात खाऊ नका. भरपूर पाणी प्या आणि शक्यतो फळे खा. यामुळे तुमचे पोट थंड राहते आणि कोणताही आजार होण्याचा धोका कमी होतो.

टीप – दिलेल्या माहितीबद्दल सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Exit mobile version