Download App

Exclusive : रोहित पवार कसे झाले सतीश मगर यांचे जावई? स्वतः सासऱ्यांनीच सांगितला किस्सा

Magarpatta City owner Satish Magar on Rohit Pawar : मगरपट्टा सिटी म्हटलं की, आपल्याला पुण्यातील उच्चभ्रु आणि सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं शेतकऱ्यांच्या सहभागातून वसवलेले टाऊनशिप डोळ्यासमोर येत. आज हा भाग पुण्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असा शहरातील सर्व गोष्टींना पर्याय ठरणारा लक्झरी एरिया मानला जातो. मात्र या भागाच आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांचे नातू त्याचबरोबर कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे एक खास कनेक्शन आहे, हे खास कनेक्शन काय आहे? हे जाणून घेऊया…

सतीश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटी या टाऊनशिपचे संस्थापक आहेत. त्यांच्या कन्या कुंती यांचा विवाह कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे सतीश मगर रोहित पवार यांचे सासरे आणि रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई आहेत. मात्र मगर यांनी रोहित पवारांची जावई म्हणून निवड कशी केली याचा किस्सा त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितला.

सतीश मगर सांगतात, रोहित पवार यांचे वडील आणि मी कॉलेजमध्ये मित्र होतो. एकाच होस्टेलवर राहत होतो. त्यामुळे मी दरवर्षी दिवाळीला पवार साहेबांची भेट घेण्यासाठी बारामतीला जात असे. असंच एका दिवाळीला मी रोहित पवार यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांनी तेच ग्रॅज्युएट झालेले होते. अशी आमची पहिली भेट झाली होती. असं ते म्हणाले. त्याचबरोबर पुढे ते असं देखील सांगतात की, या स्थळासाठी काही विशेष प्रस्ताव वैगेरे गेला नव्हता. कारण पवार कुटुंबाशी चांगले आणि घनिष्ट संबंध असल्याने आमच्या मित्र मंडळतून या स्थळाविषयी सुचवण्यात आले होते असं सतीश मगर यांनी सांगितलं.

रोहीत पवारांना राजकारणात किंवा मतदारसंघ निवडताना काही सल्ला दिला होता का? असा प्रश्न विचारला असता. पवारांना राजकारण शिकवण्या एवढे आपण मोठे झालेलो नाही अशी प्रांजळ कबुली देखील यावेळी रोहीत पावर यांचे सासरे आणि मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांनी दिली.

लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप बिझिनेस महाराजा’ हे मुलाखत सूत्र सुरू केले आहे. यामध्ये नामांकित उद्योगपती, उद्योजक बांधकाम व्यावसायिक यांच्या जीवनाविषयीची फिलॉसॉफी, त्यांचं व्यवसायातील यश, त्या मागचे कष्ट प्रयत्न आणि विशेष म्हणजे जी नवी पिढी अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये उतरू इच्छित आहे. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या युक्त्या अशा सर्व गोष्टी या मुलाखत सत्रामध्ये जाणून घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान या मुलाखत सत्राची सुरुवात पुण्यातील मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्या मुलाखतीने करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले अथक परिश्रम, खडतर प्रवास आणि मिळालेले यश त्याचबरोबर विविध विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली.

Tags

follow us