पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना

LetsUpp l Govt.Schemes महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्व तालुक्यात रोपवाटिका (Nursery)स्थापन करण्यासाठी ही योजनना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रास्तावित आहे. शेतकऱ्यांच्या (Farmesrs)आर्थिक उत्पन्न (financial income) आणि भाजीपाला उत्पादनात वाढ करणे (Increase in vegetable production), हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (maharashtra-punyashlok-ahilya-devi-holkar-nursery-subsidy-scheme) गणेश कारखाना निवडणुकीत […]

Ahilyadevi Holkar Nursery

Ahilyadevi Holkar Nursery

LetsUpp l Govt.Schemes
महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्व तालुक्यात रोपवाटिका (Nursery)स्थापन करण्यासाठी ही योजनना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रास्तावित आहे. शेतकऱ्यांच्या (Farmesrs)आर्थिक उत्पन्न (financial income) आणि भाजीपाला उत्पादनात वाढ करणे (Increase in vegetable production), हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (maharashtra-punyashlok-ahilya-devi-holkar-nursery-subsidy-scheme)

गणेश कारखाना निवडणुकीत विखेंना मोठा धक्का ! कोल्हे-थोरातांना आठ जागा

रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अटी :
– रोपवाटिका उभारण्यासाठी अर्जदार लाभार्थीकडे पाण्यची कायमची सोय असणे आवश्यक.
– अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
– त्याचा सातबारा उतारा आवश्यक आहे.
– योजनेंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारावी लागेल.
– या घटकांतर्गत यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटिका धारक, शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खासगी रोपवाटिका धारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोखरा किंवा इतर कोणत्याही योजनेतून संरक्षित शेत शेडनेट व हरितगृह घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्री फडणवीसांनी…

लाभार्थी निवड :
– यामध्ये लाभार्थींची निवड करताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे.
– महिला बचत गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य.
– भाजीपाला उत्पादक तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल.

प्रकल्पासाठी अर्थसहाय्य

Nursery

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– अर्ज
– कृषी पदवीबाबत कागदपत्रे
– शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक छायांकित प्रत
– सातबारा उतारा
– आठ-अ प्रमाणपत्र
– स्थळ दर्शक नकाशा
– आधार कार्डची छायांकित प्रत
– चतुसिमा
– अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र
हमीपत्र.

योजनेसाठी अर्ज कुठे करावा? :
या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या
शेतकऱ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज स्वीकारणार आहेत.

संपर्क कुठे करावा
– तालुका कृषी अधिकारी
-https://mahadbt.maharashtra.gov.in/

Exit mobile version