साहित्य :
125 ग्रॅम पीठ
30 ग्रॅम Dairy
1/4 कप पाणी
75 ग्रॅम पिठीसाखर
75 ग्रॅम खोया
75 ग्रॅम नारळ
1 चमचे तूप
आवश्यकतेनुसार बदाम
आवश्यकतेनुसार पिस्ता
30 ग्रॅम रवा
आवश्यकतेनुसार चिराउंजी
आवश्यकतेनुसार हिरवी वेलची
आवश्यकतेनुसार केशर
कृती :
Step 1: करंजीचे सारण
पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप रवा भाजून घ्या. यानंतर पॅनमध्ये एक कप बारीक किसलेले सुके खोबरे, चारोळी, बदाम- पिस्त्याचे काप, वेलची आणि केशर मिक्स करा. गॅस मध्यम आचेवरच ठेवा. सर्व सामग्री एकजीव करून घ्या.
Step 2: करंजीचे पीठ मिळून घ्या
बाउलमध्ये एक कप मैदा घ्या, त्यात अर्धा कप तूप मिक्स करा. तूप आणि मैदा नीट मिक्स करून घ्या. आता पिठामध्ये थोडं-थोडं कोमट पाणी ओता. करंजीसाठी पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
Step 3: सारणामध्ये साखर- मावा मिक्स करा
पॅनमधील मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक कप पिठी साखर, एक कप भाजलेला मावा मिक्स करावा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावी. तयार झाले करंजीचे सारण.
Step 4: सारण भरून करंजी तयार करा
करंजीच्या पिठाचे छोटे- छोटे गोळे तयार करून पुरीसारखं लाटा. लाटलेली पुरी करंजी मेकरमध्ये ठेवून त्यात सारण भरा. करंजी फुटू नये, यासाठी पुरीच्या कडेवर थोडेसे पाणी लावावे.
Step 5: करंज्या फ्राय करा
कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर करंज्या फ्राय करून घ्या. चॉकलेटी रंग येईपर्यंत करंज्या तळत राहा. तयार आहे तुमची करंजी.