Download App

मॅट्रीक पास, आयटीआय उमेदवारांसाठी CRPF मध्ये 9212 पदांसाठी मेगाभरती

  • Written By: Last Updated:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मधये विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या भरतीतून केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांची भरती होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी, 9105 जागा पुरूष उमेदवारांसाठी आणि 102 महिला उमेदवारांसाठी आहेत. अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. उमेदावारांनी 27 मार्च पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जावरील सर्व फील्डमध्ये योग्य माहिती भरली असल्याची खात्री करावी. एकदा उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यानंतर, त्या अर्जात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. या संदर्भात फॅक्स, ईमेल, हॅंड डिलिव्हरी इत्यादीद्वारे विनंत्या विचारात घेतल्या जाणार नाही.

शैक्षणिक अर्हता-
10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात आयटीआय (ITI)

सीटी/ड्रायव्हर
केंद्र किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता असावी.
उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन् असावे.
भरतीच्या वेळी ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असावं.

सीटी/मेकॅनिक मोटार वाहन –
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किंवा समकक्षद्वारे 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण असावं.
मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र.
याशिवाय, उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.

(अधिकच्या माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा)

संगमनेरमध्ये भीषण अपघात! मोटारसायकलची टॅंकरला धडक, 3 जण जागीच ठार, 1 गंभीर जखमी

शारीरिक पात्रता
खुल्या प्रवर्गासाठी उंची –
पुरुष – 170 C.M.
महिला – 157 C.M.

मागासवर्गीय उंची –
पुरुष – 162.5 C.M.
महिला – 150 C.M.

खुल्या प्रवर्गातील पुरुष छाती –
80 C.M.व फुगवून 5 C.M. जास्त

मागासवर्गीय पुरुष छाती –
76 C.M.व फुगवून 5 C.M. जास्त

भरतीसाठी फी –
ओपन/ OBC/ EWS – 100 रुपये
मागासवर्गीय/ महिला – फी नाही

निवड प्रक्रिया
कॉन्स्टेबल पदासाठी ऑफलाइन अर्ज करण्याचा पर्याय नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे.
त्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईळ.
हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा होईल.
सीआरपीएफ सर्व परीक्षांवर देखरेख करेल.
Medical Test च्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रं आणि प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

पगार
21,700 ते 69,100 रुपये

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला द्या : https://crpf.gov.in/

Tags

follow us