Download App

Melinda French Gates : महिलांच्या हक्कांसाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स $1 अब्ज रुपये देणार

मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी पुढील दोन वर्षांत जगभरातील महिलांच्या प्रजनन अधिकारांसह लैंगिक समानतेसाठी 1 अब्ज रुपये देण्याची घोषणा केली.

Women’s Rights : बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सह-संस्थापक मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी पुढील दोन वर्षात अमेरिकेतील प्रजनन अधिकारांसह जागतिक स्तरावर महिला आणि कुटुंबांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना एक अब्ज देणगी देण्याची घोषणा केली आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. (Women’s Rights) मेलिंडा फ्रेंच गेट्स या अमेरिकेत लैंगिक समानतेच समर्थन करणारांपैकी एक आहेत. दरम्यान, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली असून त्यांचा 7 जून हा फाउंडेशनमधील शेवटचा दिवस आहे.

एक अब्ज देणगी

मेलिंडा फ्रेंच गेट्स म्हणाल्या, गेल्या काही आठवड्यांपासून मी महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी, त्यांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी अमेरिकेत काम करणाऱ्या गटांना, पिव्होटल व्हेंचर्स या आमच्या संस्थेद्वारे नवीन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या गटांमध्ये राष्ट्रीय महिला कायदा केंद्र, नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स अलायन्स आणि सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह राइट्स यांचा समावेश आहे असं त्या म्हणल्या आहेत. याच्याच माध्यामातून मी पुढील दोन वर्षात अमेरिकेतील प्रजनन अधिकारांसह जागतिक स्तरावर महिला आणि कुटुंबांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना एक अब्ज देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

निराशेच्या भावनांमध्ये जगावं लागतं

फ्रेंच गेट्स यांनी अमेरिकेतील मुलींच्या मृत्यू दरावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या कृष्णवर्णीय आणि मूळ अमेरिकन यांच्यामध्ये फरक आहे. सुमारे 14 राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की, येथील महिलांचा कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा ठेवायची की नको हा अधिकार संपुष्टात आला आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय पगारी रजा नसलेले प्रगत राष्ट्रातील आपण एकमेव लोक आहोत. त्यामुळे अनेक महिलांना सतत दुःख, निराशेच्या भावनांमध्ये जगावं लागतं असंही त्या म्हणाल्या आहेत.

अनेक दिवसांपासून निराश

पुढे बोलताना मेलिंडा फ्रेंच गेट्स म्हणाल्या, लैंगिक समानतेबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही असं म्हणणाऱ्या लोकांमुळे मी गेल्या अनेक दिवसांपासून निराश आहे. कारण आर्थिक पातळीवर महिलांसाठी गुंतवणूक केल्यानंतर त्याचा सर्वांनाच फायदा होते हे संशोधनातून समोर आलेलं आहे. मात्र, मानसिकतेमुळे या गोष्टी लोक मान्य करत नाहीत असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, महिलांप्रती विचारसरणी अशा गोष्टींना खतपाणी घालते असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us