MPSC Recruitment : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणं कठीणं झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतचं असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. मात्र, तुम्ही पधवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 7 हजार 510 पदांच्या बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?
आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक आदी पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात दुय्यम निरीक्षकाची 6 पदे भरण्यात येणार आहेत. पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 32 हजार रुपये ते 1 लाख 1 हजार 600 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
तांत्रिक सहाय्यकाचे 1 पद भरण्यात येणार असून यासाठी पदवीधर ही पात्रता आहे. या पदासाठी दरमहा 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये वेतन असेल.
कर सहाय्यकाच्या 468 जागा भरल्या जाणार आहे. त्यासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग गती किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
लिपिक-टंकलेखक पदांची 7 हजार 35 पदे भरण्यात येणार आहेत. पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. त्यांचा मराठी टायपिंग ३० श. प्र. मि. किंवा इंग्रजी टायपिंग 40 SPM गती असणं आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 200 रुपये ते 63 हजार 200 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
या पदभरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये आकारण्यात येणार आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 344 रुपये शुल्क आकारले जाईल.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून उमेदवार 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी 17 डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा होणार आहे.
अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.