MPSC Recruitment 2023: एमपीएससी अंतर्गत प्राचार्य, अनुवादक पदांची भरती, या ताऱखेपर्यंत करा अर्ज

MPSC Recruitment 2023 : सध्या अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क आणि अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन […]

MPSC कडून पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिध्द; पद संख्या अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या...

MPSC Bharti 2023

MPSC Recruitment 2023 : सध्या अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क आणि अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 साठी वयोमर्यादा, नोकरीचे स्थान आणि अर्ज शुल्क याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं 

उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी. अर्ज करतांना अर्जात कोणताही चूक करू नये, खोटी माहिती भरू नये. अन्यथा अर्ज फेटाळल्या जाईल, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

एकूण पदांची संख्या- 32

पदाचे नाव – प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-बी.

शैक्षणिक पात्रता –
प्राचार्य/संचालक: पीएच.डी.
अनुवादक मराठी गट-क: मराठी भाषेतील पदवी
अनुवादक हिंदी गट-क: हिंदी भाषेतील पदवी
सहाय्यक वन सांख्यिकी गट-ब: पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू करण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://mpsconline.gov.in/candidate

जाहिरात-

https://drive.google.com/file/d/16qeOkbZ_SAfTT9YetmHxdmbICSXAHOl3/view

https://drive.google.com/file/d/1ZiVpm7ZG92aPBRyF0LnaspiFaGDWMdZq/view

https://drive.google.com/file/d/1AmK8-xbMgH4mWF5SYRSUL4o8SSmfYnwG/view

परीक्षेची पद्धत: अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. ही परीक्षा 200 गुणांचा असेल. लेखी परीक्षेची माहिती आयोगाच्या वेबसाइटवरच उपलब्ध असेल. या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

Exit mobile version