Billionaires list on Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीमधील घसरण सुरुच आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये (bloomberg billionaires index) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला मागे टाकले आहे.
मुकेश अंबानी आता 13 व्या क्रमांकावरून 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $1.04 अब्जने वाढली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे आता 85.8 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मार्क झुकरबर्गची संपत्ती 85.5 अब्ज डॉलर आहे. दुसरीकडे, अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या 20 मध्ये पोहोचल्यानंतर गौतम अदानी पुन्हा घसरले आहेत. गौतम अदानी 21 व्या स्थानावरून थेट 23 व्या स्थानावर घसरले आहेत. अदानीच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे त्यांची संपत्ती कमी होत आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन जुंपली, फडणवीसांचा थेट आव्हाडांना इशारा
गौतम अदानींची संपत्ती सतत कमी होत आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी पहिल्या 2 मध्ये होते. एक काळ असा होता जेव्हा गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापासून काही पावले दूर होते. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीची संपत्ती सातत्याने घसरत आहे.
सध्या गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीतील टॉप 20 च्या बाहेर आहे. गौतम अदानी यांची या वर्षात आतापर्यंत 63.5 अब्ज डॉलरची संपत्ती कमी झाली आहे. सोमवारी अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने त्यांची एकूण संपत्ती $4.78 अब्जने कमी झाली.
फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट सध्या ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती $208 अब्ज आहे. इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. मस्क यांच्याकडे 170 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. इलॉन मस्कची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत $33.1 अब्जने वाढली आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत 22.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती $130 अब्ज आहे. आणि बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स यांची 125 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.