LetsUpp | Govt.Schemes
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेसाठी स्त्रोत शाश्वती, पाण्याची गुणवत्ता व कुटुंब पातळीवर जल सुरक्षा यावर भर देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते.
योजनेच्या प्रमुख अटी :
• 100 टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य.
• जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे.
• गाव हगणदारीमुक्त होणे आदी.
Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला
आवश्यक कागदपत्रे : प्रस्तावित योजनांसाठी आवश्यक त्या जमिनीचे संपादन, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे किंवा आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेणे.
लाभाचे स्वरूप असे :
गावातील सर्व नागरीकांना घरोघरी किमान 40 LPCD पाणी उपलब्ध करुन देणे.
या ठिकाणी संपर्क साधावा :
• सर्व जिल्हा परिषद
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
• पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)