“सिंघानियांनी अत्याचार केले, पण अंबानींमुळे वाचलो” : नवाज मोदींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

नवी दिल्ली : रेमंड ग्रुपचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी मला आणि माझी मुलगी निहारिका हिला मारहाण केली, आमचा शारिरीक छळ केला. पण अंबानी कुटुंबाच्या मध्यस्थीमुळे आम्ही वाचलो असा गौप्यस्फोट त्यांच्या पत्नी आणि फिटनेस कोच नवाज मोदी (Nawaz Modi) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. इंडिया टुडेच्या […]

Nawaz Modi Alleged That Gautam Singhania Beat Me And My Daughter Niharika

Nawaz Modi Alleged That Gautam Singhania Beat Me And My Daughter Niharika

नवी दिल्ली : रेमंड ग्रुपचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी मला आणि माझी मुलगी निहारिका हिला मारहाण केली, आमचा शारिरीक छळ केला. पण अंबानी कुटुंबाच्या मध्यस्थीमुळे आम्ही वाचलो असा गौप्यस्फोट त्यांच्या पत्नी आणि फिटनेस कोच नवाज मोदी (Nawaz Modi) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. इंडिया टुडेच्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. यावर सिंघानिया यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपल्या दोन मुलींच्या हितासाठी आपण आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखू इच्छितो आणि कोणतीही टिप्पणी करणे टाळतो असे ते म्हणाले. (Nawaz Modi alleged that Gautam Singhania beat me and my daughter Niharika)

नवाज मोदी म्हणाल्या, 10 सप्टेंबर रोजी सकाळी सिंघानियांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी वाढदिवसाच्या पार्टीनंतर मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली. यानंतर आम्ही पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटत होते की, पोलीस मदतीला येणार नाहीत. त्यावेळी त्यांची मैत्रिण अनन्या गोएंका हिला फोन केला. निहारिकाने तिचा मित्र विश्वरूपलाही बोलावले. तो सिंघानियाचा चुलत भाऊ त्रिशाकर बजाज यांचा मुलगा आहे. गौतम सिंघानिया यांनी पोलिसांना येण्यापासून रोखले. पण या प्रकरणात नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी आम्हाला वाचवले आणि पोलिसांच्या कारवाईत मदत केली, याबद्दल देवाचे आभार मानते.

HBD Kartik Aaryan: केक कापण्यापूर्वी कार्तिक आर्यनने ‘ही’ खास इच्छा केली व्यक्त, म्हणाले…

तब्बल 75 टक्के संपत्ती देण्याची केली मागणी :

दरम्यान, घटस्फोटानंतर नवाज मोदी यांनी पोटगी म्हणून तब्बल 75 टक्के संपत्तीची मागणी केली आहे. यामध्ये तिने तिच्या दोन मुलींसाठी देखील संपत्तीची मागणी केली आहे. निहारिका आणि निशा या त्यांना दोन मुली आहेत. तर गौकम यांना तब्बल 1.1 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 11 हजार कोटींची संपत्ती आहे. ज्यामधून त्यांना तब्बल आपली 75 टक्के संपत्तीची मागणी केली आहे.

दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी आपल्या पत्नीच्या या मागणीची पूर्तता करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र यावेळी गौतम यांनी एक फॅमिली ट्रस्ट बनवण्याचा सल्ला त्यांच्या पत्नीला दिला. ज्याचे एकमेव ट्रस्टी गौतम सिंघानिया असतील आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना त्यांची संपत्ती मिळेल. मात्र या सल्ल्याला सिंघानिया यांच्या पत्नीने नाकार दिला आहे.

‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा लवकरच चढणार बोहल्यावर? अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

तर सिंघानिया दांपत्याच्या या घटस्फोटाचे प्रकरणामध्ये गौतम यांच्या बाजूने खेतान अँड कंपनी यांचे सीनियर पार्टनर हैग्रीव खेतान हे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या बाजूने मुंबईतील लॉ फर्म रश्मिकांत यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणामध्ये आणखी एक पार्टनर समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version