शेअर मार्केटने तोडला 14 महिन्यांचा रेकॉर्ड; निफ्टी 50 आणि सेन्सेक्स नव्या उंचीवर

शेअर बाजाराने आज नवा विक्रम रचलाय. निफ्टी 50 ने 26, 295 चा जादुई आकडा गाठला. निफ्टीमधील हा नवा उच्चांक म्हणावा लागेल.

SHARE MARKET HIKE

SHARE MARKET NEW RECORD

Nifty hits fresh all time high : शेअर बाजारात आपल नशीब आजमावण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला आज लॉटरी लागू शकते. शेअर बाजाराने आज नवा विक्रम रचलाय. निफ्टी 50 ने 26, 295 चा जादुई आकडा गाठला. निफ्टीमधील हा (NIFTY) नवा उच्चांक म्हणावा लागेल. BSE सेन्सेक्सनेही (SENSEX) पहिल्यांदाच 86 हजारांचा टप्पा ओलांडलाय. सकाळी 10:19 ला निफ्टी 50.73 ने 0.28 टक्क्यांनी वाढून 26,278 चा टप्पा पार केलेला पाहायला मिळालं.. तर BSE सेन्सेक्स 294 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 85,903 .02 वर बंद झाला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे मोठ्या लेव्हलवर जरी नफा नोंदवला गेला असला तरी मार्केटचा कल सकारात्मक राहिल्याचं पाहायला मिळालंय.

इमीड‍िएट रेजिस्टेंस झोन आता 26,350 ते 26,450 च्या मध्ये पाहायला मिळतोय. खालच्या बाजूचा विचार केला तर 26,200 ते 26,150 च्या जवळ स्ट्रॉग दिसत आहे. दरम्यान ट्रेंडिंग व्हॉल्युम आणखी वाढण्याची शकता आहे. जो उच्च मोमेंटमला सपोर्ट करेल. तर 0.68 वर पुट कॉल रेशो हा अवघड वाटेल. मात्र तरीही त्यातून बॅलन्स्ड मार्केट पोजिशन दिसून येते. 26,300 च्या वर कायमच क्लोजिंग शॉर्ट टर्म आणि नवीन रेकॉर्ड बनू शकतात.

Deepika Padukone : 10 वर्षांनंतरही ‘तारा’ जिवंत: तमाशामधील दीपिकाचा अभिनय नव्या पिढीचा आवाज बनला

आज बँक निफ्टी इंडेक्स देखील 59,804.65 च्या रेकॉर्डवर पोहोचलेली पाहायला मिळते. ICICI बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, ऍक्सिस बँक आणि IDFC फर्स्ट बँकेत देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

तर शेअर बाजारात देखील पॉजिटीव्ह रिजल्ट पाहायला मिळतोय. जागतिक मार्केटप्रमाणेच (GLOBAL MARKET) भारतीय मार्केटमध्ये (INDIAN MARKET) देखील चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. आशियाई बाजारात आलेख हा हिरव्या रंगात दिसत आहे. US फेडरल रिजर्वचे रेट कट आणि रशिया -युक्रेन यांत शांतता करार होणार असल्याच्या भरोशावर जगभरात इक्विटी बाजारात सेंटीमेंट चांगले झाल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकी शेअर बाजाराचा आलेख देखील वर गेल्याच पाहायला मिळतंय.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मार्केटमध्ये सध्या तेजी पाहायला मिळतेय. दरम्यान RBI आणि US फेडरल रिजर्वमधील संभाव्य दर कपातीमुळे सकारात्मक परिस्थिती आहे. ज्यामुळे बाजार नवीन उंचीवर जाऊ शकतो.

Exit mobile version