Download App

Nokia New Logo : नोकियाने 60 वर्षांत पहिल्यांदा बदलला लोगो, काय आहे त्या मागचा प्लॅन?

  • Written By: Last Updated:

मोबाईल फोनच्या दुनियेतील मोठं नाव असलेल्या नोकिया गेल्या काही वर्षात बाजारातून बाहेर जाताना दिसत होता. पण नोकियाने ६० वर्षांनंतर पहिल्यांदा आपला लोगो बदलला आहे. लोगो बदलल्यानंतर नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार आगमन करणार असल्याच्या चर्चा आहेत. नोकिया कंपनीने काल आपला नवा लोगो प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचा : Manish Sisodia Arrested : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं मोठं विधान…

नवीन लोगो मध्ये काय ?

नोकियाच्या नवीन लोगोमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत, जे मिळून NOKIA हा शब्द बनवत आहेत. यावेळी लोगो रंगांच्या बाबतीत खूपच चांगला आहे. पूर्वी तो फक्त निळा असायचा, पण नवीन लोगो अनेक रंगांनी बनलेला आहे जो अतिशय आकर्षक दिसतो आहे.

सर्वाधिक विकला गेलेला फोन

मागच्या काही वर्षात मोबाईल बाजारात नोकियाचा दबदबा कमी झाला असला तरी नोकियाचा नोकिया 1100 हा जगातील सर्वाधिक विकला गेलेला फोन आहे. जगभरात या फोनचे सुमारे 25 कोटी युनिट्स विकले गेले होते. नोकिया 1100 2003 मध्ये लॉन्च झाला होता. हे एक साधा आणि टिकाऊ मोबाईल म्हणून विकला गेला. त्याची कमी किंमत, दीर्घ बॅटरी आयुष्य आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल डिझाइनमुळे, त्याची मागणी जगभरात झपाट्याने होऊ लागली.

Tags

follow us