Download App

#LetsuppExclusive : Republic Day : प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचं, हे कसं ठरतं ?

  • Written By: Last Updated:

आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. दिल्लीत कर्त्यव्यपथावर संचलन होत असते. संचलनाला परदेशी पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून येत असतात. प्रजासत्ताक दिनी परदेशी नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची परंपरा पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून सुरु झाली आहे. या पाहुण्यांचा विशेष सन्मान केला जातो आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनरही दिला जातो. कोरोनाच्या लाटेमुळे गेले दोन वर्ष कोणीही प्रमुख पाहुणे बोलावले गेले नव्हते. यंदाच्या वर्षी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देह फतेह एल सिसी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. ते पूर्वी इजिप्तचे संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुख होते.

पहिला प्रजासत्ताक दिन

पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे आले होते. पहिले चार प्रजासत्ताक दिन परेड (1950 ते 1954) लाल किल्ला, रामलीला मैदान, इर्विन स्टेडियम आणि किंग्सवे रोड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. राजपथवर 1955 मध्ये पहिली परेड आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे कसे ठरवले जातात ?

प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे निवडण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे, ज्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे कोण असेल याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते. कोणाला आमंत्रण द्यायचे, त्यांना आमंत्रणे पाठवणे, त्यांच्या उत्तरानंतर त्यांचे आगमन झाल्यावर त्यांचा मुक्काम, विशेष आदरातिथ्य करणे, गार्ड ऑफ ऑनर, खास मेजवानी याची तयारी केली जाते.

प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं यावरही बराच विचार केला जातो. अनेक पैलू विचारात घेतले जातात. यामध्ये भारत आणि ज्या देशाचे प्रतिनिधी बोलावले जात आहे, त्या देशाचे संबंध जपणे ही सर्वात महत्त्वाची बाब असते. या निमंत्रणाचा अर्थ दोन्ही देशांमधील मैत्री किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणूनही याकडे पाहिले जात.

निमंत्रित पाहुण्यांच्या देशासोबत राजकीय, व्यापार, लष्करी, आर्थिक आणि इतर हितसंबंधांवर होणार्‍या परिणामाचीही विशेष काळजी घेतली जाते. याशिवाय निमंत्रित पाहुण्याला बोलावून इतर कोणत्याही देशाशी आपले संबंध बिघडणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची भारतीय परराष्ट्र मंत्रालयासाठी ही एक उत्तम संधी म्हणून पहिले जाते.

परराष्ट्र मंत्रालयाकडून केली प्रक्रिया

प्रमुख पाहुणे निवडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची परवानगी घेते. त्यांच्या सल्ल्याने किंवा परवानगीनंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाते. परराष्ट्र मंत्रालय नेहमीच एकापेक्षा अधिक लोकांना प्रमुख पाहुणे बोलावण्यासाठी परवानगी घेते. अनेकदा एकापेक्षा जास्त देशांच्या प्रतिनिधीना देखील बोलावले जाते. २०१८ मध्ये

आमंत्रण स्वीकारले की त्यानंतरची तयारी पूर्ण केली जाते. सर्व प्रमुख पाहुण्यांसोबत कोण येणार ? त्यांचा पर्सनल स्टाफ, सुरक्षा कर्मचारी सोबत पाहुण्यांचे कुटुंबीयही येतात, ज्यांच्यासाठी तितक्याच काळजीने व्यवस्था केली जाते. कारण प्रमुख पाहुणे हे प्रजासत्ताक दिनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.

ऐतिहासिक संबंधांचेही महत्त्व

प्रमुख पाहुणे निवडताना भारताचे त्या देशासोबतचे ऐतिहासिक संबंध कसे आहेत हेही लक्षात ठेवले जाते. यंदाच्या वर्षी इजिप्तचे अध्यक्ष बोलावले आहेत. कारण इजिप्त हा भारतासाठी एक महत्त्वाचा देश आहे. कारण 1950 आणि 1960 च्या दशकात तो अलिप्ततावादी चळवळीचा मुख्य सहकारी होता.

Tags

follow us