ICC T20 International Rankings : आयसीसी टी20 रँकिंगमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा दबदबा (ICC T20 Rankings) कायम आहे. या यादीत एक दोन नाही तर तब्बल सात भारतीय खेळाडूंचा (Indian Players) समावेश आहे. आयसीसीच्या टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये दहापैकी चार खेळाडू भारतीय आहेत. यातील तीन खेळाडू आगामी आशिया कपसाठीच्या (Asia Cup 2025) स्क्वाडमध्येही आहेत.
आयसीसी मेन्स टी20 रँकिंगमध्ये भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा अव्वल आहे. अभिषेक 829 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत तिलक वर्मा (Tilak Verma) 804 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 739 पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल 673 पॉइंट्ससह या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी मात्र यशस्वीचा संघात निवड झालेली नाही.
Bronco Test : रग्बी खेळातील ब्रोंको फिटनेस टेस्ट आता क्रिकेटमध्ये; BCCI ने बदलला नियम
आयसीसी मेन्स टी20 बॉलिंग रँकिंगमध्ये तीन भारतीय गोलंदाज आहेत. यातील दोघे जण आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात खेळताना दिसतील. बॉलिंग रँकिंगमध्ये भारताचा युवा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती 704 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. वरुणचा आशिया कपसाठीच्या 15 सदस्यांच्या संघात समावेश आहे. रवी बिश्नोई 674 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. तसेच या यादीत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग 653 पॉइंट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांची नवी पण चक्रावून टाकणारी (ICC ODI Ranking) रँकिंग जारी केली आहे. या यादीत चक्क 9 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. आयसीसीच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत फक्त एक वेगवान गोलंदाज आहे. उर्वरित नऊ फिरकी गोलंदाज आहेत. न्यूझीलंडचा मॅट हेनरी हा एकमेव गोलंदाज या यादीत आहे. 622 गुणांसह हेनरी या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
हेनरी व्यतिरिक्त जसप्रित बुमराह, कागिसो रबाडा, जोश हेझलवूड यांच्यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत मात्र यातील एकाही गोलंदाजाला या रँकिंगमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे या रँकिंगवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची घटलेली संख्या आणि कसोटी, टी 20 क्रिकेटला मिळत असलेलं प्रोत्साहन यामुळे वेगवान गोलंदाजांना रँकिंगमध्ये स्थान मिळालं नसावं असं तज्ज्ञांना वाटतं.
अरेच्चा गडबड झाली! वेगवान गोलंदाजांच्या यादीत फिरकी गोलंदाज; ICC ची चक्रावणारी रँकिंग जाहीर