अरेच्चा गडबड झाली! वेगवान गोलंदाजांच्या यादीत फिरकी गोलंदाज; ICC ची चक्रावणारी रँकिंग जाहीर

अरेच्चा गडबड झाली! वेगवान गोलंदाजांच्या यादीत फिरकी गोलंदाज; ICC ची चक्रावणारी रँकिंग जाहीर

ICC ODI Ranking : आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांची नवी पण चक्रावून टाकणारी (ICC ODI Ranking) रँकिंग जारी केली आहे. या यादीत चक्क 9 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजांचा वेग मुळातच कमी असतो. तरी देखील या गोलंदाजांना वेगवान गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये का समाविष्ट केले असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जाणून घेऊ या..

आयसीसीच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत फक्त एक वेगवान गोलंदाज आहे. उर्वरित नऊ फिरकी गोलंदाज आहेत. न्यूझीलंडचा मॅट हेनरी हा एकमेव गोलंदाज या यादीत आहे. 622 गुणांसह हेनरी या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. हेनरी व्यतिरिक्त जसप्रित बुमराह, कागिसो रबाडा, जोश हेझलवूड यांच्यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत मात्र यातील एकाही गोलंदाजाला या रँकिंगमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे या रँकिंगवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ दोन सीनियर खेळाडूंची सुट्टी; कर्णधार कोण?

यामागे नेमकं काय कारण असू शकतं याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे. एकदिवसीय सामन्यांची घटलेली संख्या आणि कसोटी, टी 20 क्रिकेटला मिळत असलेलं प्रोत्साहन यामुळे वेगवान गोलंदाजांना रँकिंगमध्ये स्थान मिळालं नसावं असं तज्ज्ञांना वाटतं.

या यादीत न्यूझीलंडचा मॅट हेनरी हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. झिम्बाब्वेत झालेल्या टी20 मालिकेत फायनल सामन्यात त्याने प्रभावी गोलंदाजी केली होती. हेनरीच्या कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड विजयी झाला होता. हेनरीने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांत 136 विकेट घेतल्या आहेत. तसेच 91 वनडेत 165 तर 25 टी 20 सामन्यांत 37 विकेट्स घेतल्या आहेत. टीम साउदी आणि ट्रेंट बोल्ट यांच्या निवृत्तीनंतर हेनरी न्यूझीलंड गोलंदाजीचा मुख्य गोलंदाज ठरला आहे.

रँकिंगमधील दहा गोलंदाज

केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)
महेश तीक्ष्णा (श्रीलंका)
कुलदीप यादव (भारत)
बर्नार्ड स्कोल्ट्ज (नामिबिया)
राशिद खान (अफगाणिस्तान)
मिचेल सँटनर (न्यूझीलंड)
मॅट हेनरी (न्यूझीलंड)
वानिंदू हसरंगा (श्रीलंका)
रवींद्र जडेजा (भारत)
अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)

मॅक्सवेलचं तुफान! थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube