Bronco Test : रग्बी खेळातील ब्रोंको फिटनेस टेस्ट आता क्रिकेटमध्ये; BCCI ने बदलला नियम

  • Written By: Published:
Bronco Test : रग्बी खेळातील ब्रोंको फिटनेस टेस्ट आता क्रिकेटमध्ये; BCCI ने बदलला नियम

What is Bronco Test? The rugby-style fitness test for Team India explained : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI ने खेळाडूंच्या फिटनेस टेस्टच्या नियमात बदल केला असून, आता खेळाडूंना ब्रोंको टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरच टीम इंडियात एन्ट्री मिळणार आहे. नेमकी ही टेस्ट काय? ती कशी केली जाणार हे जाणून घेऊया…

अरेच्चा गडबड झाली! वेगवान गोलंदाजांच्या यादीत फिरकी गोलंदाज; ICC ची चक्रावणारी रँकिंग जाहीर

रग्बी खेळात वापरली जाते ब्रोंको टेस्ट

खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी नव्याने वापण्यात येणारी ब्रोंको टेस्ट रग्बी खेळात वापरली जाते. यात खेळाडूंची एरोबिक क्षमता आणि धावण्याची क्षमता तपासली जाते. तसेच, या चाचणीमध्ये मैदानावर अधिक काळ खेळण्याची आणि लांब अंतरापर्यंत धावण्याची क्षमता तपासली जाते.

बोंको टेस्ट नेमकी कोणत्या खेळाडूंसाठी?

ब्रोंको टेस्ट प्रामुख्याने जलद गोलंदाजांसाठी (Fast Bowler) आहे. ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, खेळाडूंचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि त्यांना दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवण्यासाठी ब्रोंको टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

मोठी बातमी, आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिल उपकर्णधार

ब्रोंको चाचणी म्हणजे काय?

ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर, ही एकप्रकारे खेळाडूंची एरोबिक क्षमता आणि धावण्याची क्षमता तपासणारी टेस्ट आहे. यामध्ये, खेळाडूला एकाच सेटमध्ये २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरची शटल रन पूर्ण करावी लागेल यात खेळाडूंना न थांबता एकूण पाच सेट पूर्ण करावे लागतील. भारतीय खेळाडूंना ६ मिनिटांत ब्रोंको चाचणी उत्तीर्ण होण्यास सांगण्यात आले आहे. एक खेळाडू पाच सेटमध्ये सुमारे १२०० मीटर धावेल.

अबब! सचिनचा लेक अर्जुन ‘इतक्या’ संपत्तीचा मालक; वाचा कुठून कमावतो पैसा?

ब्रोंको चाचणी का सुरू करण्यात आली?

ब्रोंको चाचणीची शिफारस स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांनी केली होती. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही यावर सहमती दर्शवली. वेगवान गोलंदाजाने जिमपेक्षा धावण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे असे ले ​​रॉक्स यांचे मत आहे. अलिकडेच इंग्लंड दौऱ्यावर फक्त मोहम्मद सिराजच पाचही कसोटी सामने खेळू शकला आणि त्याने प्रत्येक सत्रात त्याच वेगाने गोलंदाजी केली. मात्र, उर्वरित गोलंदाज लांब स्पेल टाकून कंटाळल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळेच भारतीय खेळाडू विशेष करून वेगवान गोलंदाज अधिख काळापर्यंत मैदानावर टिकून राहण्यासाठी भीरतीय खेळाडूंना ब्रोंको टेस्ट सुरू करण्यात आली असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या या टेस्टमध्ये किती गोलंदाज उत्तीर्ण होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube