BCCI ऑफीसमध्ये चोरी, तब्बल साडेसहा लाखांच्या जर्सीवर चोरट्यांचा डल्ला; घटनेनं खळबळ!

BCCI ऑफीसमध्ये चोरी, तब्बल साडेसहा लाखांच्या जर्सीवर चोरट्यांचा डल्ला; घटनेनं खळबळ!

BCCI News : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे (BCCI News) ऑफीस आहे. येथून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या या कार्यालयात चक्क चोरी झाली आहे. या ठिकाणी लाखो रुपयांचं साहित्य गायब झालं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. इतकी कडेकोट सुरक्षा असताना चोरी होण्याचा प्रश्नच नाही असेच अनेकांना वाटत होते. तरीदेखील चोरी झालीच पण ही चोरी करणाऱ्याचा पत्ता मिळाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या कार्यालयातून आयपीएलची जर्सी चोरीला गेली आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण या जर्सीची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे. या चोरीच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. इतकी सुरक्षा व्यवस्था असताना ही चोरी कुणी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. रिपोर्टनुसार हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून तेथीलच गार्ड आहे ज्याने एकूण 261 जर्सी चोरल्या. यातील एका जर्सीची किंमत 2500 रुपये इतकी आहे.

बीसीसीआयनेच केलं विराटला आऊट?; कसोटी निवृत्तीनंतरच्या अहवालाने खळबळ

या गार्डला अटक करण्यात आली आहे. चोरी का केली याचं उत्तर गार्डने पोलिसांना दिलं आहे. ऑनलाइन जुगारासाठी चोरी करावी लागली असे या गार्डने पोलिसांनी सांगितलं. विशेष म्हणजे, त्याने एकाच टीमची नाही तर वेगवेगळ्या टीमच्या जर्सींची चोरी केली होती. यानंतर त्याने या जर्सी हरियाणातील एका पुरवठादाराला विकल्याची माहिती समोर आली आहे.

या जर्सी कोणकोणत्या खेळाडूंच्या आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही चोरीची घटना 13 जून रोजी घडली होती. ऑडीट करतेवळी स्टोअर रुममधील स्टॉक गायब असल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक गार्ड एका डब्यात जर्सी घेऊन जात असताना दिसून आला. पोलिसांतील एका सूत्राने सांगितलं की या जर्सी चोरीच्या आहेत याची माहिती ऑनलाइन डिलरला नव्हती.

मला कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त व्हायचय; भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयला कळवलं

दरम्यान, गार्डने एकूण 261 जर्सी चोरल्या होत्या यातील 50 जर्सी पु्न्हा मिळवल्या आहेत. गार्डल डिलरकडून या जर्सींचे पैसे अकाउंटमध्ये मिळाले होते. मात्र तो हे सगळे पैसे ऑनलाइन जुगारात गमावून बसला. तरीही पोलिसांकडून त्याच्या बँक खात्याची तपासणी केली जात आहे. हा गार्ड खरं बोलत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube