Download App

पाकिस्तानमध्ये चीनचा मोठा डाव, CPEC प्रोजेक्टचा दुसरा टप्पा मंजूर; भारताला धोका?

भारत दौरा आटोपताच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी थेट पाकिस्तानात (China Pakistan) दाखल झाले.

China Pakistan Relation : भारत दौरा आटोपताच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी थेट पाकिस्तानात (China Pakistan) दाखल झाले. येथे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भारताची डोकेदुखी वाढवणारा निर्णय घेण्यात आला. चीनकडून पाकिस्तानला पुन्हा महत्व देण्यात येऊ लागले आहे. यामागे कारणही आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात जवळीक वाढत आहे. यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केले की आगामी काळात CPEC (चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल.

या प्रोजेक्टमध्ये फक्त मुलभूत सुविधाच नाही तर इंडस्ट्रियल कोऑपरेशन, टेक्नोलॉजी आणि एनर्जी प्रोजेक्ट देखील असतील. इशाक डार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आज आम्ही अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही सकारात्मक संकेत दिले. तसेच यात भारत विरोधी असे काहीच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानच्या दृष्टीनेही ही बैठक महत्वाची आहे. याआधी काबूल शहरात बैठक झाली होती. यात पाकिस्तान देखील होता. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी ताळमेळ साधणे, सीपीएसीशी अफगाणिस्तानला जोडणे तसेच येथील अमेरिकेचा प्रभाव कमी करणे तसेच चीनचे प्रभुत्व प्रस्थापित करणे हा या बैठकीचा उद्देश होता. यात चीन कितपत यशस्वी होतो याचे उत्तर आताच देणे शक्य नाही.

मोठी बातमी! पाकिस्तानकडून अनेक हवाई मार्ग बंद, धक्कादायक कारण…

अमेरिका विरुद्ध चीन

सन 2000 मध्ये याच पद्धतीने अमेरिकेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात आपला प्रभाव वाढवला होता. हाच प्रकार आता चीन करत आहे. यात त्याला यश येताना दिसत आहे. अफगाणिस्तान जरी भारताचा विरोधी दिसत नसला तरी भविष्याचा अंदाज देता येत नाही. सध्या अफगाणिस्तानात तालिबान सरकार आहे. या सरकारशी भारताचा संवाद कमी झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश भारताचे कट्टर वैरी आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान या देशांकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तिघांची मैत्री भारतासाठी नक्कीच धोक्याची ठरू शकते असे तज्ज्ञ सांगत आहेत.

पाकिस्तानकडून हवाई मार्ग बंद

भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग (Airport) तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची किंवा एअर-डिफेंस लष्करी सरावाची तयारी करत असल्याच्या अटकळींना उधाण आले आहे.

भारत-रशियाची मोठी डील! ऊर्जा करारावर शिक्कामोर्तब, ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला चकवा?

follow us