Download App

ओएनजीसीमध्ये 2500 जागांसाठी जंबो भरती, अर्ज प्रक्रियेला सुरूवात, वाचा कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

ONGC Recruitment 2023 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC मध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये अॅप्रेंटीसशीपसाठी विविध पदांवर भरती केली जाणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ONGC च्या या भरतीअंतर्गत एकूण 2500 पदांची भरती केली जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 20 सप्टेंबरपर्यंत या जागांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसंदर्भातील आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आदी तपशीलवार माहिती अधिकृत नोटीफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करतांना उमदेवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कारण, अर्ज करतांना कोणतीही त्रुटी झाल्यास किंवा अर्ज दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद केल्या जाईल. अर्ज करतांना उमदेवारांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

एकूण पदे – 2500

शैक्षणिक पात्रता-
ग्रॅज्युएट अॅप्रेंटीसशीप – बीए/ बीकॉम/ बीएससी/ बीबीए/ बीई किंवा बीटेक
डिप्लोमा अॅप्रेंटीसशीप – डिप्लोमा
ट्रेड अॅप्रेंटीसशीप – दहावी/ बारावी / आयटीआय

वय श्रेणी :
ONGC च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 20 सप्टेंबर 1999 ते 20 सप्टेंबर 2005 दरम्यान झालेला असावा.

मानधन:
पदवीधर शिकाऊ – रु. 9000
डिप्लोमा शिकाऊ – रु. 8000
ट्रेड अप्रेंटिस – रु. 7000

शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून श्रेयवादाची लढाई, सरकारकडून अनावरणास स्थगिती; ठाकरे गटाची कोंडी! 

निवड प्रक्रिया:
पात्रता परीक्षेत मिळालेल्या मार्कांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सामान्य गुण असलेल्या उमेदवारांची निवड वय ज्येष्ठतेच्या आधारावर केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2023
ONGC निवड निकाल: 5 ऑक्टोबर 2023

जाहिरात-
https://ongcindia.com/documents/77751/2660534/apprenticeship2023.pdf/788211c7-a0f3-826c-a62a-166826bed9ca

 

Tags

follow us