Download App

Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू, महिन्याला ६० हजार पगार

  • Written By: Last Updated:

Panvel Municipal Recruitment 2023 : जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. तर मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याविषयी सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदांची संख्या – ७ पदे

शैक्षणिक पात्रता –
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता असलेल्या शिक्षण संस्थेतून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

नोकरीचे ठिकाण – पनवेल, रायगड

वयोमर्यादा – ७० वर्षे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं केवळ 3 वर्षासाठी भारतात, वाघनखं ‘या’ दिवशी येणार 

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता –
पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवळे तलावासमोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

मुलाखतीची तारीख- 4 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाइट –
panvelcorporation.com

पगार-
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी वरील पत्त्यावर संबंधित तारखेला म्हणजे 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. दस्तऐवजांचा तपशील अधिसूचनेत दिलेला आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1LwoBy0gTUOOOXRKQDWsFV–_QL_rKkA5V/view

Tags

follow us