PCMC Bharti 2024: आज स्पर्धा इतकी वाढली आहे की, सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं फारच अवघड झालं आहे. दरम्यान, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) एका रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंजवड महानगरपालिकेत सल्लागार पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता या पदासाठी अर्ज करावा. अर्ज कसा भरायचा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ? याच विषयी तपशीवर माहिती आज आपण जाणून घेऊया.
पद आणि पदांची संख्या- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील या रिक्त पदाचे नाव सल्लागार आहे. या पदासाठी एकच जागा रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रता – रेपटाईल्स आणि अॅम्बिअन व एव्हेरी मधील कामाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराला शासकीय स्तरावर वन्यजीव सल्लागार विषयक कामाचा अनुभव असावा.वन्य जीव व सर्प क्षेत्रात naturalist म्हणून कामकाज केल्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी अर्ज करतांना उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, रहिवाशी दाखला, 10 वी आणि बारावीची प्रमाणपत्रे, फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
नोकरीचे ठिकाण- सल्लागार पदासाठी निवडलेल्या व्यक्तीची नोकरी पिंपरी चिंचवडमध्ये असेल.
अर्ज करण्याची पद्धत – या पदभरतीसाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – तुम्ही अर्ज खालील पत्त्यावर पाठवू शकता.
(माननीय आयुक्त पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरूनगर रोड, पिंपरी 18)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2024 आहे त्यामुळे वेळ न घालवता तारखेपूर्वी अर्ज करा.
निवड प्रक्रिया – या पदासाठी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा
मुलाखतीचा पत्ता – खालील पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहा.
(मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरा मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे-मुंबई रस्ता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 18)
मुलाखतीची तारीख – मुलाखत 5 मार्च 2024 रोजी होईल.
अधिकृत वेबसाइट – https://www.pcmcindia.gov.in/
पगार: सल्लागार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 70 हजार रुपये पगार देण्यात आला.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने सल्लागार पदासाठी अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार माहिती वाचावी. कारण अर्ज चुकला किंवा अर्जात काही चुका राहिल्यास अर्ज नाकारला जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. महत्वाचं म्हणजे, शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.