कुक्कुटपालन अनुदान योजना

LetsUpp | Govt.Schemes शासनाच्यावतीने राज्यातील (Maharashtra Government)ग्रामीण भागात (Rural Aria), रोजगार निर्मिती (Employment generation)व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना २०१३ पासून राबविली जात आहे. योजनेसाठी प्रमुख अटी : ▪ सर्वसाधारण अर्जदाराकडे ३ गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे १.५ (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा. ▪ अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच […]

Poultry

Poultry

LetsUpp | Govt.Schemes

शासनाच्यावतीने राज्यातील (Maharashtra Government)ग्रामीण भागात (Rural Aria), रोजगार निर्मिती (Employment generation)व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना २०१३ पासून राबविली जात आहे.

योजनेसाठी प्रमुख अटी :
▪ सर्वसाधारण अर्जदाराकडे ३ गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे १.५ (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा.
▪ अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक.
▪ पक्षीगृहाचे बांधकाम आराखडयाप्रमाणे असावे.
▪ अर्जदाराचे कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीला नसावे.

लाभाचे स्वरूप :
– प्रकल्पाची एकुण किमंत रु. २ लाख, २५०००/-
– सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान
अनूसूचित जाती / अनूसूचित जमातीसाठी ७५ टक्के अनुदान

आवश्यक कागदपत्रे :
▪ ओळखपत्राची सत्यप्रत
▪ ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
▪ प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
▪ जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
▪ रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रत.
▪ अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा)
▪ रहिवासी दाखला

संपर्काचे ठिकाण : अर्जदार राहत असलेल्या भागातील पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Exit mobile version