Download App

गुढीपाडव्याला घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट खवा बासुंदी

  • Written By: Last Updated:

बासुंदी ही एक स्वादिष्ट डिश आहे. भारतातील पश्चिम भागात म्हणजे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात बासुदी अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात तर सणासुदीला अनेकांच्या घरी बासुदी बनवली जाते. उद्या गुढीपाडवा आहे. अनेकांच्या काहीतर गोडधोड बनवण्याची तयारी सुरू झाली असेल. दरम्यान, गुढीपाडव्याला घरात काय गोड बनवायचं याचा बेत ठरला नसेल तर अर्ध्या तासात तयार होणारी खवा बासुंदी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.

साहित्य :
अर्धा लीटर म्हशीचं दूध
साखर 1 वाटी
तुप 2-3 चमचे
विलायची पावडर
दुध पावडर
केसर
सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता)

गुढीपाडव्याला घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट खवा बासुंदी

कृती :
– बासुंदी तयार करण्यासाठी आधी एक खोल तळाचा पॅन घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा आणि दूध उकळवा.
– दूध सतत पळीने किंवा चमच्याने ढवळत रहा आणि एकदा दूध उकळत असल्याचे दिसले की लगेच गॅस कमी करा. नंतर दूध ढवळत राहा.
– त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या गॅसवर खवा तयार करण्यासाठी एका भांड्यात 2-3 चमचे दूध टाका.
– काही वेळानंतर त्या तूपात 1 कटोरी साखर टाका.
– दूधाला चांगली उकळी फुटू द्या.
– दूधाला चांगली उकळी फुटल्यानंतर त्यात दुध पावडर टाका.
– त्यानंतर खवा दाटसर होईपर्यंत दुध ढवळत राहा.
– आता खवा तयार झालेला असेल.
– त्यानंतर तयार झालेला खवा हा तुम्ही आधी तापवलेल्या दुधात टाका.
– दूधात खवा टाकल्यानंतर त्यात आवश्यक तेवढं केशर आणि साखर टाका.
– त्यांतर हे मिश्रण काही वेळ तापू द्या.
– हे मिश्रण चांगलं गरम झाल्यानंतर त्यात सुकामेवा टाका.
-सुकामेवा टाकल्यानंतर पळीने ते मिश्रण चांगलं हलवा.
– मिश्रण हलवल्याने ते घट्ट होईल.
– त्यानंतर बासुदींत विलायची टाका. विलायची टाकल्यानं बासुदी चवदार होईल.

Tags

follow us