Download App

बनवा खास मिक्स डाळींचे वडे

साहित्य
1.4 कप भिजलेले मूग डाळ
1 चमचे जिरे
1 कप किसलेले नारळ
1 कप कोथिंबीरीची पाने
आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
1 inch आले
1 Pinch हळद
1 Pinch हिंग
आवश्यकतेनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तूप
1 कप भिजलेले तूळ डाळ
1.2 कप भिजलेले चणा डाळ

Step 1:
हिरव्या मिरच्या, आलं, हळद, हिंग, जिरे व थोडंसं पाणी घालून सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून जाडसर पेस्ट तयार करा
Step 2:
दुस-या मिक्सरच्या भांड्यात तूर डाळ, चणा डाळ व मुग डाळ वाटून बारीक पेस्ट बनवा आणि आधी केलेल्या पेस्टमध्ये ही पेस्ट चांगली मिक्स करा.
Step 3:
आता या पेस्टमध्ये बारीक किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला आणि सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करा.
Step 4:
सर्व सामग्री चांगली मिक्स झाल्यानंतर त्याला वड्यांचा आकार द्या. पुढे, इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि त्यात वडे ठेवून २० ते २५ मिनिटे वाफेवर वडे शिजवून घ्या.

Step 5:
तयार आहेत आपले टेस्टी व हेल्दी मिक्स डाळींचे वडे! या गरमा गरम वड्यांचा आपण पुदिन्याची हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, शेजवान चटणी, खोब-याची चटणी किंवा सॉससोबत आस्वाद घेऊ शकतो.

Tags

follow us